शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरणातील आर्वतन उद्या होणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 20:28 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले.यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी

पुणे : खडकवासला धरण प्रकल्पातून दौंड, इंदापूर व बारामतीमधील काही ग्रामीण भागासाठी सोडलेले आवर्तन अंतिम टप्प्यात असून येत्या शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी धरणातील आवर्तन बंद केले जाणार आहे. कालव्यातून सुमारे ३० दिवस ग्रामीण नागरिकांना पाणीसाठी व शेतीसाठी पाणी सोडण्यात आले, असे खडकवासला धरण प्रकल्पातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत खडकवासला धरण प्रकल्पात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यातच पुणे महापालिकेचा पाणी वापर वाढल्याने यंदा ग्रामीण भागाला दिले जाणारे एक आवर्तन रद्द करण्यात आले आहे. गेल्या १२ मार्चपासून ग्रामीण भागासाठी या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. जलसंपदा विभागाकडून ७ मे पर्यंत (२७ दिवस) हे आवर्तन दिले जाणार होते. मात्र, त्यात तीन दिवस वाढ करून १० मे पर्यंत पाणी सोडले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार ग्रामीण भागास २.६८ टीएमसी पाणी दिले जाणार होते. परंतु, तीन दिवस अधिक पाणी सोडल्याने ग्रामीण भागाला सुमारे तीन टीएमसी पाणी देण्यात आले. दरवर्षी ग्रामीण भागाला उन्हाळ्यातील आवर्तन सोडताना ४ ते ४.५ टीएमसी पाणी दिले जाते. मात्र, यंदा धरणात पाणीसाठा कमी असल्याने आवर्तनात कपात केली आहे.---खडकवासला धरण प्रकल्पात ५ टीएमसी पाणी खडकवासला धरण प्रकल्पात गुरूवारी (दि.९) ५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षी ९ मे रोजी धरणात ८.०७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे यंदा धरणात तीन टीएमसी पाणीसाठा कमी आहे. टेमघर धरणाच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे टेमघरमध्ये सध्या शून्य टीएमसी पाणी आहे. खडकवासला धरणात ०.५३ टीएमसी, पानशेतमध्ये २.९६ टीएमसी आणि वरसगाव धरणात १.५२ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणी