शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धुलिवंदन आणि रंगपंचमीला खडकवासला जलाशय दूषित होण्यापासून थांबवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 18:56 IST

जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन

ठळक मुद्देपुणे जिल्हाधिकारी, तहसीलदार, खडकवासला ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन

पुणे : तरुण-तरुणी धुलिवंदन आणि रंगपंचमीला रंग खेळून खडकवासला जलाशयात उतरतात. या रंगांमुळे जलाशय दूषित होत आहे. हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मंगळवारी (दि. १०) आणि शुक्रवारी (दि. १३) खडकवासला जलाशय रक्षण अभियानांतर्गत सकाळी ९ ते ७ या वेळेत ही खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवून ते दूषित होण्यापासून थांबवणार आहे. हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर, गार्गी फाउंडेशनचे विजय गावडे, खडकवासला ग्रामपंचायत सदस्य विजय कोल्हे आदी उपस्थित होते. गोखले म्हणाले, की हिंदू जनजागृती समिती मागील १७ वर्षांपासून हे अभियान राबवित आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा जलाशय दूषित करणे, हे सर्वथा अयोग्य आहे. हे थांबवण्यासाठी अभियानात सहभागी होणारे कार्यकर्ते जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करतील. हिंदू जनजागृती समितीच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभाग, खडकवासला ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले आहे. अभियानासाठी प्रशासन सर्वतोपरी साहाय्य करेल. त्यावेळी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पेटकर म्हणाल्या, की काही वर्षांपूर्वी युवक-युवती रंग खेळून जलाशयात उतरत होते. हे अभियान सुरू झाल्यावर ते जागरूक झाले आहेत. तसेच येथे घडणाऱ्या गैरप्रकारांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ०००

टॅग्स :PuneपुणेDamधरणHoliहोळी