शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

खडकवासला धरण भरले; १७०० क्युसेक्सने विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 13:54 IST

पुणे शहराच्या दृष्टीने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत महत्वाचा आहे.

ठळक मुद्देपहाटे १७०० क्युसेक्सने पाणी सोडला नदी किनाऱ्यावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पानशेत धरण क्षेत्रात १६ मिमी पाऊस खडकवासला धरण साखळीत आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू

पुणे : खडकवासला धरण ९५ टक्के भरले. बुधवारी (दि. १०) रात्री उशिरा ५०० क्युसेक्स पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस अजुनही सुरु असल्यामुळे गुरूवारी (दि.११) रोजी १७०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार यांनी केले आहे. खडकवासला धरण साखळीत आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पानशेत धरण क्षेत्रात १६ मिमी पाऊस पडला असून ४.४२ टीएमसी पाणी जमा झाले आहे. वरसगाव धरणक्षेत्रात १६ मिमी पाऊस पडला असून ३.८७ टीएमसी पाणी साठले आहे. टेमघर धरण क्षेत्रात ४० मिमी पाऊस पडला असून ०.५४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर खडकवासला धरण क्षेत्रात ८ मिमी पाऊस पडला असून १.७८ टीएमसी पाणी जमा झाले होते. प्रकल्पातील चारही धरणांत मिळून सध्या १०.६१ टीमएसी एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराच्या दृष्टीने खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत महत्वाचा आहे. शहरातीलन नागरिकांना पिण्यासाठी आणि हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूर यां तालुक्यातील शेतकºयांना सिंचनादृष्टीने या पाण्याचा उपयोग होतो. आठवडाभरापासून धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने चार धरणांतील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जवळपास ३१ टीएमसी क्षमता असलेल्या धरण साखळीत सध्या १०.६१ टीमएसी पाणीसाठा जमा झाला आहे.  

टॅग्स :PuneपुणेDamधरणWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका