शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

khadakwasala Vidhan Sabha Election Result 2024: खडकवासल्यात दोडकेंचा तब्बल ५२ हजारांनी पराभव; वांजळेंच्या उमेदवारीचा दोडकेंना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 14:05 IST

khadakwasala Assembly Election 2024 Result २०१९ मध्ये २५०० मतांनी निसटता पराभव झालेल्या दोडकेंचा भीमराव तापकीर यांनी ५२ हजार ३२२ मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा पराभव केला

पुणे : यंदा खडकवासला विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडेल की काय? अशी शक्यता वाटत असताना मतदारांनी पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनाच साथ दिल्याने चौथ्यांदा मतदारसंघात ‘कमळ’ फुलले. मतदारसंघात ‘भाजप’चा गड राखण्यात तापकीर यांना यश मिळाले. गतवर्षी केवळ २५०० मतांनी निसटता पराभव झालेल्या सचिन दोडके यांचा भीमराव तापकीर यांनी ५२ हजार ३२२ मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा पराभव केला. तापकीर यांना १ लाख ६३ हजार १३१, दोडके यांना १ लाख १० हजार ८०९ आणि मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांना ४२,८९७ मते पडली.

खडकवासला मतदारसंघामध्ये एकूण १४ उमेदवार रिंगणात असले, तरी महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर, महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्यात तिरंगी लढत झाली. त्यामध्ये तापकीर यांनी तब्बल ५२ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. या विजयामुळे खडकवासला मतदारसंघ हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खडकवासला मतदारसंघाची निर्मिती २०१९ मध्ये झाली आणि पहिल्याच निवडणुकीत मनसेचे रमेश वांजळे हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. २०२१ मध्ये वांजळे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या हर्षदा वांजळे यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत विजयासाठी तापकीर यांचा कस लागला. मतदारसंघ हातातून जातो की काय? असे वाटत असताना तापकीर यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ २५०० मतांनी विजय मिळवता आला. सलग तीनवेळा आमदार राहिल्यामुळे यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत तापकीर यांना मतदार नाकारण्याची शक्यता वर्तविली जात होती. शनिवारी (दि. २३) सकाळी ८ वाजता कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. प्रारंभी ६६५ टपाली मतदानाची मोजणी झाली. त्यात भीमराव यांना ३६५ तर दोडके यांना ३६५ मते मिळाली. त्यानंतर पहिल्या फेरीत सचिन दोडके यांना ४७७६ आणि दुसऱ्या फेरीत १०,८२१ तर तापकीर यांना ४१७१ आणि १०४४० मते पडली. पहिल्या व दुसऱ्या फेरीत दोडके १०६४ मतांनी आघाडीवर होते. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत तापकीर यांनी १२७४ मतांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत आघाडी कायम राखत विजयश्री खेचून आणली. यंदा खडकवासला मतदारसंघात ५६.५३ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असल्याने हे वाढीव मतदान तापकीर यांच्यात पदरात पडल्याचे निकालातून दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचा दोडके यांना फटका

गतवर्षी २५०० इतक्या कमी मतांनी विजयी ठरलेल्या भीमराव तापकीर यांना यंदाची निवडणूक जिंकणे तितकेसे सोपे नव्हते. त्यामुळे खडकवासल्याची जागा महायुतीच्या वाट्याला येऊनही तापकीर यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यास पक्षाने काहीसा विलंब लावला. यातच मनसे नेते राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे मतांची विभागणी होण्यासाठी मनसेकडून मयुरेश वांजळे यांना उभे करण्यात आले होते. त्यानुसार झालेही तसेच. मयुरेश वांजळे यांना ४२,८९७ इतकी मते मिळाली. वांजळे यांनी दोडके यांची मते घेतल्याचा थेट फ़ायदा तापकीर यांना झाला. याशिवाय ‘कर्ण कितीही चांगला असला तरी शेवटी तो दुर्योधनाच्या पक्षातच असणार आहे,’ हा चुकीचा पक्ष आहे, असा दोडके यांच्याविरुद्ध अपप्रचारदेखील करण्यात आला होता. त्याचाही काहीसा परिणाम दोडके यांच्या विजयावर झाला तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचा फटकाही दोडके यांना बसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.भीमराव तापकीर - १,६३,१३१

सचिन दोडके - १,१०,८०९मयुरेश वांजळे - ४२,८९७

हा विजय केवळ माझा नव्हे तर जनतेचा - भीमराव तापकीर

जनतेने मला सलग चौथ्यांदा निवडून दिले आहे. त्याबद्दल मी जनतेचा मनापासून ऋणी आहे. हा विजय केवळ माझा नाही तर जनतेचा विजय आहे. यापुढेही जनतेच्या विकासाच्या स्वप्नांचा, त्यांच्या समस्यांचे समाधान करीत एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार आहे, अशी भावना खडकवासला मतदारसंघातील महायुतीचे विजयी उमेदवार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने निकालापूर्वीच विजयाची मिरवणूक काढली आणि फलक लावले होते, असे विचारल्यावर केवळ एकच म्हण आठवते की ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशी मिश्कील टिप्पणी तापकीर यांनी केली. निवडणुकीत संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. २०१९ च्या निवडणुकीत देखील प्रतिस्पर्धी उमेदवाराने हेच केले होते. पण तेव्हाही पराभव स्वीकारावा लागला होता असेही ते म्हणाले.

मंत्रीपद मिळाले नाही तरी मी समाधानी 

खडकवासल्याच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज हा माझ्यासाठी प्राधान्य असेल. आपल्या एकतेच्या जोरावर आपण आपल्या मतदारसंघाला विकासाच्या नवीन उंचीवर नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्रीपद मिळाले तर आनंदच होईल. पण ते केंद्र आणि राज्य नेतृत्व निर्णय घेतील. मंत्रीपद मिळाले नाही तरी मी समाधानी आहे, असे तापकीर यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024khadakwasala-acखडकवासलाbhimrao tapkirभीमराव तापकिरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीBJPभाजपा