केशवनगरमध्ये सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:12 IST2018-10-20T01:12:31+5:302018-10-20T01:12:39+5:30

मुंढवा : केशवनगर येथील शिवाजी चौकातील फ्लोरिडा इस्टेटच्या सुरक्षारक्षकाला काल चार अज्ञातांकडून मारहाण झाली. ही घटना दि. १० आॅक्टोबर ...

Keshavnagar society beat up the security guard | केशवनगरमध्ये सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण

केशवनगरमध्ये सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण

मुंढवा : केशवनगर येथील शिवाजी चौकातील फ्लोरिडा इस्टेटच्या सुरक्षारक्षकाला काल चार अज्ञातांकडून मारहाण झाली. ही घटना दि. १० आॅक्टोबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास सोसायटीच्या आवारात घडली. या घटनेत त्या चार अज्ञातांनी सुरक्षारक्षकाची केबिनची मोडतोड व टेलिफोनची मोडतोड करून ते तेथून पसार झाले. या घटनेमुळे फ्लोरिडा इस्टेट सोसायटीत भीतीचे वातावरण पसरले होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवनगर येथे फ्लोरिडा इस्टेट सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये सेवासुविधा भूखंड म्हणून ७२५६.३३ चौरस मीटर जागा आहे. त्या जागेच्या मालकी हक्कावरून विकसक अनिरुद्ध शेवलेकर व फ्लोरिडा इस्टेट बी. ई सोसायटी यांच्यात न्यायालयात वाद सुरू आहेत. हे असताना या भूखंडावर कंपाऊंड घालण्यासाठी सुमारे तीस जण आले होते. त्यापैकी चार जणांनी, गेटवर काम करणाऱ्या सुरक्षारक्षकास धमकावून, काम पूर्ण होईपर्यंत कोठेही जाऊ नये, सोसायटी आॅफिसमध्ये फोन करून कळवू नये, असे धमकावून, गेटवरील फोनची तोड-फोड केली. अशी सुरक्षारक्षक जियारूलहक मुशरफ हुसेन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.


केशवनगर येथील फ्लोरिडा इस्टेट बी. व ईच्या सोसायटी यांच्या सेवा-सुविधा भूखंडामध्ये अनिरुद्ध शेवलेकर व त्यांच्या कामगार सोसायटीच्या हक्काच्या जागेमध्ये बेकायदेशीर पत्र्याचे कंपाऊंड करीत असल्याचा अर्ज सोसायटीचे चेअरमन क्रिस फर्नांडिस यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात ४ आॅक्टोबर रोजी दिला होता. त्या अर्जावर पोलिसांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे, की कागदपत्रांची तपासणी केली असता स. नं ४१ / १ मध्ये सेवा-सुविधा भूखंड म्हणून ही जागा आहे.

Web Title: Keshavnagar society beat up the security guard