शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दुचाकीच्या डिक्कीत सामान ठेवताय ? जरा सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 19:56 IST

महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणे, हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणे, दुचाकीमधले पेट्रोल चोरणे या गोष्टी शहरात सातत्याने घडत असताना आता या नव्या चोरीच्या प्रकाराने नागरिकांची झोप उडवली आहे.

ठळक मुद्देदुचाकीच्या डिक्की उघडणे सहज शक्य असल्याने त्यातील सामानाची चोरी

प्रसंग १ : सिहंगड रस्ता येथील हिंगणे खुर्द परिसरात एका महिलेने दुचाकीच्या डिक्कीमध्ये सामान ठेवले होते. गाडी घराबाहेरच पार्क केली होती. सामानाची पिशवी रात्रभर डिक्कीतच राहिली. त्या बाहेर काढायला विसरल्या. दुस-या दिवशी सामान काढायला गेल्यातर त्यांना पिशवीच गायब झाल्याचे दिसले. खूप शोधाशोध केली तेव्हा थोड्यावेळाने रिकामी पिशवी काही अंतरावर पडल्याचे दिसले मात्र,पिशवीमधील सामान चोरीला गेले होते. हा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला.--------------------

प्रसंग २ : प्रभात रस्ता परिसरात महिलेने गाडी पार्क केली होती. लग्नाला जाऊन आल्यानंतर ५०० रूपयांचे परत आहेराचे पाकिट त्यांनी घाईघाईमध्ये डिक्कीमध्ये ठेवले होते. त्या ते घ्यायच्या विसरल्या. दोन तासाने येऊन पाहतात तर ते पाकिट आणि गॉगल चोरीला गेल्याचे लक्षात आले. 

.....................

पुणे : एखाद्या ठिकाणी दुचाकी पार्क करून कुठ जायचं म्हटलं की हमखास नको असलेले सामान डिक्कीमध्ये ठेवले जाते. मात्र यापुढे सामान डिक्कीमध्ये ठेवण्याआधी चारवेळा विचार करा?, डिक्कीमध्ये सामान ठेवले तर ते चोरीला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये डिक्कीमधील सामान चोरीला जाण्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे चोरांपासून सावधान! डिक्कीमध्ये सामान ठेवून चोरांच्या हातात आयते कोलीत देऊ नका. महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणे, हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणे, दुचाकीमधले पेट्रोल चोरणे या गोष्टी शहरात सातत्याने घडत असताना आता या नव्या चोरीच्या प्रकाराने नागरिकांची झोप उडवली आहे. कुठेही बाहेर फिरायला किंवा आॅफिस काम अथवा लग्नाला जाताना नको असलेल्या गोष्टी बाळगणे शक्य नसल्याने हमखास दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवण्याची एक सवय झालेली असते. मात्र आता हीच सवय पुणेकरांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण आता डिक्कीमधील सामान चोरण्याचा नवा फंडा चोरट्यांकडून आजमावला जात आहे. तुम्ही कुठ गाडी पार्क करीत आहात? तुम्ही डिक्कीमध्ये कोणते सामान ठेवत आहात,यावर चोरट्यांची बारकाईने नजर असते. तुम्ही गाडी सोडून गेलात की हे चोर तुमच्या गाडीपाशी जातात, यात काही विशिष्ट कंपनीच्या दुचाकीच्या डिक्की उघडणे सहज शक्य असल्याने ते कुणाच्याही नकळतपणे त्यातील सामान चोरून नेतात. या डिक्की उघडण्यासाठी चाव्याही तयार करण्यात आल्या असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशाप्रकारे डिक्कीमधून सामान चोरून गेल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. मात्र सामान काहीसे किरकोळ असल्याने त्याची तक्रार नोंदवायला फारसे कुणी जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :PuneपुणेtheftचोरीCrimeगुन्हाtwo wheelerटू व्हीलर