शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चाळे करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनी केले अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 10:20 IST

या प्रकरणी पोलिसांनी उरुळी कांचन आणि दौंड तालुक्यातील सात महिलांना ताब्यात घेतले

केडगाव : चौफुला परिसरात ये-जा करणाऱ्या पुरुषांना अश्लील हावभाव, हातवारे करून शारीरिक संबंधासाठी उत्तेजित करणाऱ्या ७ महिलांना केडगाव पोलिसांनीअटक केली आहे. चौफुला ते सुपा रोडवर पीएमटी बस थांब्यापासून काही अंतरावर असलेल्या पुलाजवळ काही महिला अर्धनग्न कपडे घालून देहप्रदर्शन करत येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.या दरम्यान, केडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार बी. पी. शेंडगे, पोलीस हवालदार पी. एस. मस्के, महिला पोलीस शिपाई स्वप्नाली टिळवे आणि पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी तातडीने महिला पंच घेत माहिती मिळालेल्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी बोरीपार्धी-चौफुला हद्दीत, केडगाव ते सुपा रोडवरील पुलाजवळ पीएमटी बस थांब्याजवळ ६ ते ७ महिला अश्लील वर्तन करत पुरुषांना अश्लील हावभाव व हातवारे करून शारीरिक संबंधासाठी उत्तेजित करताना आढळल्या.या प्रकरणी पोलिसांनी उरुळी कांचन आणि दौंड तालुक्यातील सात महिलांना ताब्यात घेतले. मंगळवारी (दि. ३) दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस शिपाई राजीव सापळे यांनी फिर्याद दिली आहे.७ महिलांवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव व हातवारे करून लोकांना वेश्यागमनासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केडगाव पोलीस करत आहेत. या कारवाईचे चौफुला व बोरीपार्धी परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसWomenमहिलाArrestअटकCourtन्यायालय