शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबर आता कात्रज डेअरीची 'बेकरी प्रोडक्ट'मध्येही एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 14:51 IST

आता कात्रज डेअरी कुकीज हे नवीन उत्पादन घेऊन नवीन वर्षामध्ये मार्केटमध्ये उतरत आहे...

पुणे : ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतक-यांचा आधार असलेली पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) गेले अनेक वर्षे दूध व दुग्धजन्य पदार्थांबरोबरच आता "बेकरी" प्रोडक्टमध्ये देखील एन्ट्री केली आहे. क्रीम, अँगमार्क तूप, टेबल बटर, मलई पनीर, लो फॅट पनीर, सुगंधीत दूध, कपामधील दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, टेबलबटर, आईस्क्रीम, खवा, पेढा, आंबा बर्फी, मलई बर्फी, अंजीर बर्फी, कलाकंद, काजू कतली, बासुंदी, पाश्चराईज्ड क्रीमनंतर आता कात्रज डेअरी कुकीज हे नवीन उत्पादन घेऊन नवीन वर्षामध्ये मार्केटमध्ये उतरत असल्याची माहिती अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले. 

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे पुणेकरांची सुपरिचित कात्रज डेअरी संघ. कात्रज या ॲडनेमने दुधाबरोबरच विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करत आहे. यामध्ये क्रीम, अँगमार्क तूप, टेबल बटर, मलई पनीर, लो फॅट पनीर, सुगंधीत दूध, कपामधील दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, टेबलबटर, आईस्क्रीम, खवा, पेढा, आंबा बर्फी, मलई बर्फी, अंजीर बर्फी, कलाकंद, काजू कतली, बासुंदी, पाश्चराईज्ड क्रीम यासारख्या स्वच्छ, दर्जेदार दुग्धजन्य पदार्थाचे वेगवेगळ्या पॅकसाईजमध्ये व स्वादामध्ये उत्पादन करत असून,  ही सर्व उत्पादने चोखंदळ पुणेकरांचे पसंतीस उतरली आहेत. कात्रजच्या या सर्व उत्पादनांना पुणे, पिंपरी चिंचवड शहर व उपनगरांबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मोठी मागणी आहे. ही कात्रज डेअरी बरोबरच समस्त पुणेकर व जिल्ह्यातील तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी 

अभिमानाची गोष्ट आहे. कात्रज डेअरीने आयएसओ २२०००:२०१८ व आयएसओ १४००१:२०१५ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मानांकने मिळविलेले आहेत. त्याबरोबरच एनडीडीबीचे गुणवत्ता व दर्जा बाबतचे क्वालिटी मार्क हे मानांकन देखील मिळविलेले आहे. खास चोखंदळ पुणेकरांसाठी नविन वर्षांच्या आगमन प्रसंगी कात्रज डेअरी कात्रज कुकीज बाजारात विक्रीसाठी आणत आहे. संघाचे जेष्ठ संचालक बाळासाहेब ढमढेरे यांचे शुभहस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत कात्रज कुकीज उत्पादन बाजारपेठेत लाँच करण्यात आले.

कात्रज कुकीज चॉकलेट चिप्स, चॉकलेट चंक्स, कॉफी ड्रायफ्रुटस, जिंजर ड्रायफ्रुटस या चार प्रकारात १७० ग्रॅम पॅकसाईज मध्ये उपलब्ध आहे. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष विष्णू  हिंगे, उपाध्यक्ष वैशाली  गोपालघरे, संचालक भ रामचंद्र ठोंबरे, गोपाळराव म्हस्के, बाळासाहेब ढमढेरे, संदीप जगदाळे, बाळासाहेब खिलारी, दिलीप थोपटे,  व्यवस्थापक संजय कालेकर व संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तरी ग्राहकांनी कात्रज कुकीज या नविन उत्पादनांची चव चाखावी असे नम्र आवाहन हिंगे यांनी केले.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजmilkदूधpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड