शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Kasba By Election | कसब्यात मतदानासाठी पैसे वाटल्याचा व्हिडिओ व्हायरल; भाजप नेते गणेश बीडकरांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 12:39 IST

मतदानादिवशी भाजपचे काही कार्यकर्ते आणि नेते पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल...

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदार झाले. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने आणि काँग्रसकडून रविंद्र धंगेकर आमनेसामने आहेत. या निवडणुकीत भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यासाठी मविआकडून मतदानाच्या अगोदर एक दिवस आंदोलनही करण्यात आले होते. प्रत्यक्ष मतदानादिवशी भाजपचे काही कार्यकर्ते आणि नेते पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यानंतर भाजप नेते गणेश बिडकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मतदानादिवशी गणेश बीडकर पैसे वाटप करत आहेत. जो व्यक्ती व्हिडिओ काढतोय त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत असल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. याप्रकरणी फैयाज कासाम शेख (वय ३८, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील आएशा कॉम्प्लेक्स येथे रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला होता.

यातील तक्रारदार हे काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. ते मालधक्का चौक भागात त्यांचा मित्र याकूब बशीर शेख यांच्यासह फिरत असताना त्यांना काही भाजपा पक्षाचे कार्यकर्ते हे आएशा कॉम्प्लेक्स या ठिकाणी मतदारांना पैशाचे वाटप करीत आहेत, अशी माहिती मिळाली होती. त्याचीच खात्री करण्यासाठी तिथे गेले असता तक्रारदार यांच्या तोंड ओळखीचे भाजपाचे नगरसेवक गणेश बिडकर, मयुर चव्हाण, नईम शेख, बाला शेख हे उभे असल्याचे दिसले व त्यांचे हातामध्ये केशरी रंगाची पिशवी तसेच मतदारांचे स्लिपा दिसल्या. या पिशवीमध्ये पैसे विचारणा केली असता भाजप कार्यकर्त्यांकडून फिर्यादींना शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली.

टॅग्स :BJPभाजपाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसPoliceपोलिस