शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kasba By-Election | "येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल..." कसब्यात पुणेरी पाट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 19:44 IST

कसब्यात पुणेरी पाट्या पुन्हा झळकल्या...

पुणे : पुण्यात जर निवडणूक होत असेल तर पुणेरी पाट्यांचा उल्लेख येणारच. याचीच प्रचिती आता कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा समोर आली आहे. या ठिकाणी भाजपसह महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. 

अवघ्या ३ दिवसांवर येऊन ठेपलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सगळे पक्ष सज्ज असताना पुणेरी पाट्यांमुळे प्रचार गाजत आहे. "कोणी कितीही म्हटलं, तुमचं काम मार्गी लावतो पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला कुठलीही अमिष दाखवू नयेत" #यंदाकसब्यातधंगेकरच" अशा पुणेरी पाट्या कसबा मतदारसंघात दिसत आहेत.

कसब्याची निवडणूक भाजपसोबत महाविकास आघाडीने गंभीरपणे घेतली आहे. त्यामुळेच या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सगळ्या पक्षांकडून त्यांचे मुख्य नेते, मंत्री, खासदार, आमदार प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत. "येथे सोने, चांदी, पैसे इ. सर्वकाही स्वीकारले जाईल. टीप - मत मात्र रवी धंगेकरांनाच दिले जाईल!" #यंदाकसब्यातधंगेकरच" अशा मजकुराच्या पाट्याही आता कसबा मतदारसंघात दिसून आले आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेस