शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राहूल गांधींच्या फोननंतर कसब्यातून काँग्रेस बंडखोराची माघार; काय म्हणाले बाळासाहेब दाभेकर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 18:55 IST

काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला...

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. सगळ्या वरिष्ठांचा फोन आला होता पण मी त्यांचे ऐकले नाही पण ज्यावेळी राहूल गांधींचा फोन आला त्यावेळी मी निवडणुकीतून माघार घ्यायचा निर्णय घेतला असल्याचे दाभेकर यांनी सांगितले.

कसबा हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसकडून तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. त्यात रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे यांचा समावेश हाेता. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस कसबा लढवण्यावर शिक्कामोर्तब झाला आणि रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर बाळासाहेब दाभेकर नाराज झाले होते. त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला होता.

दरम्यान, दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्याकडून प्रयत्न सुरू होते. आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर, रफिक शेख, मेहबूब नादाफ यांनी दाभेकर यांच्याशी चर्चा करून मनधरणी केली. त्यानंतर गुरुवारी दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, कमल व्यवहारे, अजित दरेकर आदी उपस्थित होते. दाभेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसमधील बंडखोरी शमली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkasba-peth-acकसबा पेठBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र