शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कार्तिकी यात्रा : आज संजीवन समाधी सोहळा; वारी अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 10:58 IST

Alandi News: अलंकापुरीत ‘श्री’ची वैभवी 'रथोत्सव' मिरवणूक  

आळंदी : उभारिला ध्वज तीही लोकांवरती !               ऐसा चराचरी कीर्ती ज्यांची  !!           ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान !             मुक्ताबाई ज्ञानदीप्तीकळा !! श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७२४ व्या संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त शनिवारी (दि.१२) अलंकापुरीत ‘श्री’ची वैभवी ‘रथोत्सव’ मिरवणूक ‘माऊली - माऊली’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडली. ‘श्री’चे दर्शन घेण्यासाठी नगरप्रदक्षिणामार्गावर स्थानिकांनी गर्दी केली होती. आज (दि.१३) माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.

           तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधारती घालून पहाटेच्या सुमारास प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते शासकीय पंचोपचार पूजा पार पडली. दुपारी माऊलींना महानैवद्य देण्यात आला. सायंकाळी चारच्या सुमारास परंपरेनुसार इनामदार कुटुंबियांच्या वतीने माऊलींची विधिवत पूजा करून माऊलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी सजविलेल्या स्वयंचलित रथात विराजमान करण्यात आला. वीणा, टाळ - मृदुंगाचा निनाद आणि मर्यादित वारकऱ्यांच्या जयघोषात ही 'रथोत्सव' मिरवणूक फुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, भैराबा चौकमार्गे हजेरी मारुतीपासून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ झाला. 

        समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला केंदूर (ता.शिरूर) येथील संतश्रेष्ठ श्री. कान्होराज महाराज यांनी मंदिरात कीर्तन केले होते. त्यांची प्रथा व परंपरा आजही केंदुरकरांकडून जपली जात आहे. रात्री नऊ ते अकरा यावेळेत विना मंडपात केंदुरकर महाराजांचे कीर्तन पार पडले. रात्री उशिरा श्रींच्या गाभार्यात देवस्थानच्या वतीने नारळ - प्रसाद वाटून द्वादशीची सांगता करण्यात आली.            संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम रविवारी (दि.१३) पहाटे तीनपासून सुरु झाला आहे. संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वैद्य त्रयोदशीला अलंकापुरीत समाधी घेतली होती. गुरुवारी त्याला ७२४ वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्त ‘श्री’च्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी, माऊलींच्या मंदिरात घंटानाद, सोहळ्यावर आधारित विनामंडपात संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचे कीर्तन होणार आहे. 

               ~ आजचे कार्यक्रम ~    * रात्री १२ पासून संजीवन समाधीच्या दिवसाला प्रारंभ.* पहाटे ३ ते ५ प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती. * सकाळी ७ ते ९ हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन.* ७.३० ते ९.३० वीणामंडपात कीर्तन. * सकाळी १० ते दुपारी १२ संजीवन समाधी सोहळ्यावर ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन.  * दुपारी १२ ते साडेबारा ७२४ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी व आरती, नारळ व प्रसाद. * दुपारी २ ते ३ श्री. पांडुरंग पादुका भेट * रात्री ९.३० छबिना

टॅग्स :Alandiआळंदी