शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पुण्यात असायचा कार्नाड यांचा सातत्याने ‘रंगसंवाद’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 7:00 AM

मोहन आगाशे ते अलिकडचे मोहित टाकळकर व्हाया समर नखाते, राजीव नाईक, प्रदीप वैद्य असा त्यांचा संवाद होता....

ठळक मुद्देपुण्यात सन १९७४- ७५ च्या दरम्यान फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष

पुणे: ‘कार्नाड गेले म्हणजे फक्त एक रंगधर्मीच गेला असे नाही तर परंपरेच्या माध्यमातून आधुनिकतेच्या साह्याने समकालीन राजकीय, सामाजिक स्थितीवर भाष्य करणारा एका चिकित्सक, विवेकी, जाणत्या विचारवंतालाच आपण मुकलो’ अशीच भावना कार्नाड यांच्या सहवासात आलेल्या बहुसंख्य रंगकर्मींनी व्यक्त केली. पुण्यात सन १९७४- ७५ च्या दरम्यान फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष होण्याच्याही आधीपासून त्यांचा पुण्यातील नाट्यक्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांबरोबर संपर्क होता. मोहन आगाशे ते अलिकडचे मोहित टाकळकर व्हाया समर नखाते, राजीव नाईक, प्रदीप वैद्य असा त्यांचा संवाद होता. साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान व विनोद दोषी फेस्टिवलचे संस्थापक सदस्य अशोक कुलकर्णी हे तर त्यांचे बेळगाव व नंतर मुंबईपासूनचे महाविद्यालयीन मित्र. ते पुण्यात स्थायिक झाल्यानंतर तर हा संवाद त्यांच्या माध्यमातून अधिकच वाढला. चित्रपट अभ्यासक समर नखाते हे त्यांचे एफटीआय मधील विद्यार्थी. ते म्हणाले, ‘‘माझी मुलाखतही त्यांनीच घेतली. त्यानंतर मी पदवी घेऊन बाहेर पडेपर्यंत तेच अध्यक्ष होते. पुराणकथांना आधुनिकतेचा साज देऊन ते वर्तमान स्थितीवर टोकदार असे भाष्य करत असत. त्यांच्यामुळे त्यावेळच्या अनेक मराठी रंगकर्मींना एका व्यापक संवेदनशीलतेबरोबर स्वत:ला जोडून घेता आले. त्यांनी त्यावेळी जे काही दिले ते कायमचे बरोबर राहिले.मोहन आगाशे हेही त्यांचे सन १९७४ पासूनचे स्नेही. ते संचालक व कार्नाड अध्यक्ष असे एक वर्ष एफटीआय मध्ये झाले. आगाशे म्हणाले, ‘‘त्यावेळी मी दिवसा व रात्रीही त्यांच्याबरोबरच असायचो. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत कसे नेता येईल याचाच ते सातत्याने विचार करत असत. लोककथांचा वापर करण्याचे त्यांचे तंत्र फार प्रभावी ठरले. नाटक सिनेमा यातून त्यांनी दिग्दर्शनाबरोबरच अभिनयातही स्वत:ला आजमावून पाहिले.’’प्रदीप वैद्य यांनी कार्नाडांच्या ‘बेंडाकाळू ऑन टोस्ट’ या नाटकाचे रुपांतर केले. बेंगळूरू या शहरासंबधीची एक आख्यायिका घेऊन त्यावर आता ते शहर कसे बकाल झाले आहे असा त्याचा आशय होता. वैद्य म्हणाले, ‘‘सुरूवातीला भाषांतर करायचे होते, मात्र नाटकाचा आशय लक्षात घेता आम्ही त्यांना ‘याच धर्तीवर पुणे शहर घेऊन रूपांतर करू का’ असे भीत भीत विचारले. तक्षणी त्यांनी होकार दिला. भारतातील सर्वच शहरांची अवस्था अशी झाली आहे असे ते म्हणाले. उणेपुरे शहर एक अशा त्या नाट्यरूपांतरात मी भाषेचे विविध स्तर वापरले जे मुळ नाटकात नव्हते. त्याचेही त्यांनी प्रयोग पाहिल्यावर कौतूक केले.’’ अशोक कुलकर्णी म्हणाले, ‘‘कार्नाड बुद्धीमान रंगकर्मी होते, त्यांच्या तुलनेत मी काहीच नव्हतो, मात्र महाविद्यालयीन मैत्रीची त्यांनी कायम जाण ठेवली. माझ्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठान व विनोद दोषी फेस्टिवलला त्यांनी कायम उत्तेजन दिले, कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहिले. दोन वेळा व्याख्यानेपण दिली. रंगभूमीविषयक त्यांची जाण फार मोठी होती.’’ वैद्य म्हणाले, ‘‘ पुण्यातील अनेक रंगकर्मींबरोबर त्यांचा सातत्याने संवाद असे. मोहित टाकळकर हा नव्या पिढीचा प्रतिनिधी. त्याने त्यांचे उणेपुरे.. हे रुपांतरीत नाटक बसवले. ते पुुण्यात नाही पण बंगळूरूमध्ये डोक्यावर घेतले गेले, याचा त्यांना विलक्षण आनंद झाला. मोहितबरोबर ते नंतर कायम जोडले गेले.’’ 

टॅग्स :PuneपुणेGirish Karnadगिरिश कर्नाडTheatreनाटकcinemaसिनेमाliteratureसाहित्य