शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कळमोडी धरण तयार; पण उपसा योजना प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:18 IST

आंदोलनाचा इशारा : ८४६ हेक्टर क्षेत्रासाठी पाणी देण्याची मागणी

दावडी : कळमोडी धरण बांधून तयार आहे; परंतु धरणातून प्रस्तावित असलेली उपसा जलसिंचन योजना अनेक वर्षे प्रलंबित आहे. सातगाव पठार भागातील ५,०६६ हेक्टर क्षेत्र व खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरूडे, वाफगाव या गावांतील ८४३ हेक्टर क्षेत्रासाठी कळमोडीचे पाणी मिळण्यासाठी खेड व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ आवळली आहे.

खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील आरळा नदीवर बांधण्यात आलेल्या कळमोडी धरणाची एकूण साठवण क्षमता दीड टीएमसी इतकी आहे. या धरणातील पाणी चासकमान धरणात येते. चासकमान धरणातील काही पाणीसाठा पुन्हा पाईपलाईनद्वारे आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार या परिसरातील वेळ नदीत सोडण्यात येणार होते. वेळ नदी आंबेगाव तालुक्यातील सात गावांतून पुढे जाते,ती खेड तालुक्याच्या पूर्व भागातून जाते. मात्र, ही योजना बारगळली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे कळमोडी धरण्याच्या पाण्याबाबत भिजत घोंगडे पडले आहे. खेड तालुुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणीटंचाई असल्याने या भागांतील नागरिकांच्या भावना तीव्र आहे. दुष्काळाची संभाव्य तीव्रता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आझाद मैदानात पाच दिवस धरणे आंदोलन केले होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भेटी घेतल्या. या भागातील सर्व गावांचे सरपंच, कळमोडी धरण प्रकल्प कृती समितीचे पदाधिकारी, कनेरसर येथील यमाई देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मोहनराव दौंडकर व कुरवंडीचे सरपंच सुनीलराव तोत्रे यांच्या पुढाकाराने पेठ येथे बैठक झाली. या बैठकीस वरूडेचे सरपंच मारुती थिटे, अजय भागवत, संदीप गावडे, श्रीनिवास गावडे, हनुमंतराव दौंडकर तसेच सातगाव पठार गावातील सरपंच, आंबेगाव बाजार समिती संचालक जयसिंग एरंडे व डॉ. ताराचंद कराळे तसेच शेतकरी उपस्थित होते. बैठकीत या प्रश्नी लढा देण्यासाठी कळमोडी प्रकल्प कृती समिती स्थापन करून सर्व गावच्या ग्रामसभा घेऊन शासनाला गांभीर्य लक्षात यावे, यासाठी सर्व ग्रामसभांचे ठराव पाठवून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी एकत्रित पाठपुरावा करण्याचे ठरले, त्यानुसार सातगाव पठार, खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, गोसासी, वरूडे, वाफगाव व शिरुर तालुक्यातील केंदुर, पाबळ या गावांच्या विशेष ग्रामसभा २५ तारखेपर्यंत घेऊन सर्व गावांची पुन्हा एकत्रित बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे अशोक टाव्हरे यांनी सांगितले.आंदोलनाचा इशारा...मागील महिन्यात झालेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर होत असताना खेड, आंबेगावच्या लोकप्रतिनिधींनी कोणताही तारांकित प्रश्न वा लक्षवेधी कळमोडी संदर्भात केली नाही, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. थिटेवाडी धरणात पाणी सोडण्याबाबत पाबळ, केंदूर येथील नागरिकांची मागणी आहे. या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी अशोक टाव्हरे यांनी कळमोडी पाणलोट विकास संस्थेची स्थापना केली असून, मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना निवेदन देऊन तातडीने अंदाजपत्रक मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. शासनाने न्याय दिला नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दि. १० जानेवारी पासून बेमुदत धरणे धरण्याचा इशारा येथील शेतकºयांनी दिला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरण