शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

Karmayogi Sugar Factory: कर्मयोगीच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचे एकहाती वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:14 IST

पंचवार्षिक निवडणुकिसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

ठळक मुद्दे विद्यमान सात संचालकांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली

कळस : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Karmayogi Shankarraoji Patil Sahakari Sakhar Karkhana) पंचवार्षिक निवडणुकिसाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या (१२ ऑक्टोबर) शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे कारखान्यावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.  

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) अलिप्त भुमिका घेतल्याने भाजपच्या वतीने व काही अपक्ष असे ४६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये अर्ज भरताना व छाननी मध्ये कारखान्याला ऊस पुरवठा न केल्याने ९ जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी २१ अर्ज राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यामध्ये विद्यमान सात संचालकांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.  

बिनविरोध झालेले नवनियुक्त संचालक मंडळ 

(इंदापूर गट) - भरत शहा, शांतीलाल शिंदे,रवींद्र सरडे, (कालठण गट) -  हर्षवर्धन पाटील, हनुमंत जाधव, छगन भोंगळे, (शेळगाव गट) - बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, (भिगवन गट) - पराग जाधव, विश्वास देवकाते, गायकवाड निवृत्ती, (पळसदेव गट) -  भूषण काळे, प्रवीण देवकर, देवकर रतन, (महिला राखीव) - शारदा कुबेर पवार, कांचन अशोक कदम, (अनुसूचित जाती जमाती) - दुर्गे केशव विनायक, (इतर मागास प्रवर्ग) - सतीश उद्धव व्यवहारे (भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग) - पारेकर हिरा शंकर (ब वर्ग प्रतिनिधी) - वसंत मोहोळकर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे पी गावडे यांनी काम पाहिले.  

''इंदापुर तालुक्यातील सहकारी तत्वावरील निरा भिमा सहकारी साखर कारखान्यानंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एकहाती बिनविरोध करुन हर्षवर्धन पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र कारखानदारी अडचणीत असल्याने सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याचे मोठे आव्हान पाटील यांच्या समोर असणार आहे.'' 

टॅग्स :Indapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSugar factoryसाखर कारखानेNCPराष्ट्रवादी काँग्रेस