शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'कराडला फाशी झालीच पाहिजे', पुण्यात जनआक्रोश मोर्चा, कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 13:50 IST

बीडमध्ये कराडसारखे गुंड कंबरेला बंदूक लावून फिरतायेत, नागरिक आता घाबरलेत, सरकारने यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे

पुणे : सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे, मारेकरांना कठोर शिक्षा द्या, अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बीड हा दहशतीचा बालेकिल्ला झाला आहे. कराडसारखे गुन्हेगार मोकाट फिरू लागले आहेत. अत्यंत वाईट प्रकारे यांची हाती करण्यात आली आहे. यामध्ये कराडचा हात आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. कराडला सध्या नुसती अटक करण्यात आली आहे. पण पुढची काहीच प्रक्रिया होताना दिसत नाहीये. बीडच्या प्रकरणाला सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी विनंती यावेळी नागरिकांनी केली. 

जोडे मारो आंदोलन 

जनआक्रोश मोर्चामध्ये नागरिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. नागरिकांनी कराडच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केल्याचे दिसून आले. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत नागरिक आंदोलनात आक्रमक झाले होते. कराडच्या फाशीसाठी आंदोलन सुरूच राहील. असा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला आहे. वाल्मिक कराडला अटक झाली आहे. परंतु त्याला तुरुंगात व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याच्या आरोपही नागरिकांनी यावेळी केला आहे. 

बिहारपेक्षा महाराष्ट्र वाईट झालाय 

बीडमध्ये कराडचे सहकारी 'बाप तो बाप होता है' असे स्टेटस ठेवू लागले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहेत. बीडमध्ये हे गुंड कंबरेला बंदूक लावून फिरत आहेत. ते बिहार एवढे वाईट नाही, तेवढा आता महाराष्ट्र वाईट झालाय. सरकारने यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे. कराडसारख्या गुंडांमुळे सामान्य माणूसही अडचणीत आल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे.    

टॅग्स :Puneपुणेagitationआंदोलनbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस