शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

खेड तालुक्यातील कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ ; तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 13:15 IST

प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देचासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील १.५ टी.एम.सी असणारे कळमोडी धरण पुर्ण क्षमतेने भरले असून धरणातून आरळा नदीत तीन हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आरळा नदीतून चासकमान धरणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. प्रशासनाकडून  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कळमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील खरपुड, परसूल, भोमाळे, घोटवडी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे धरण भरण्यात मोठी मदत झाली आहे. पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने कळमोडी धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्यामुळे खालच्या भागात असलेल्या चासकमान धरणामधील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

चासकमानधरणातही १ टी.म.सी पाण्याची वाढ झाली असून, भामा आसखेड धरणही ५० टक्के भरले आहे. आराळा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. दरवाजा विरहीत असलेल्या या धरणाच्या सांडव्यावरून सध्या प्रती सेकंद तीन हजार क्युसेकपेक्षा अधिक पाणी आरला नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १.५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे.

आरळा नदीत सोडलेल्या पाण्याचा चासकमान धरणात संचय होतो. तसेच गेल्या तीन दिवसांपासून चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषतः भीमाशंकर, भोरगिरी, कारकुडी, मंदोशी, कुडे परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चासकमान धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसKhedखेडDamधरणWaterपाणी