शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही; आठवलेंची राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:30 IST

'त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही. परंतु काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही'

इंदापूर  : 'त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही. परंतु काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही 'अशा शब्दांत नीलम गोऱ्हे विरुध्द संजय राऊत प्रकरणासंदर्भात केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले. सोलापूरहून मुंबईकडे जाताना सोमवारी (दि.२४) सायंकाळी आठवले हे काही काळ येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.     आठवले म्हणाले की, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे समाजवादी कार्यकर्त्या म्हणून पुढे आल्या. त्यांनी काही वर्षे रिपाइंचे काम केले आहे. शिवसेनेत ही काम केले. त्याना तेथे चार वेळा आमदार केले. आता त्या शिंदेसेनेत आहेत. काहीतरी वक्तव्य करुन एका महिलेचा अपमान करणे योग्य नाही असे म्हणत त्यांनी राऊत  यांच्यावर टीका केली आहे. 

लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता

विवाह सोहळ्याच्या निमित्त एकत्र आलेले उद्धव ठाकरे व राज ठाकरे कायमस्वरुपी एकत्र येतील असे आपल्याला वाटत नाही. ते एकत्र आले तरी महाराष्ट्रात त्या दोघांची ताकद नगण्य आहे. राज ठाकरे यांच्या एवढ्या मोठ्या सभा होऊन ही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा एक ही उमेदवार निवडून आला नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसले नाही. दोघे एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम होणार नाही, असे आठवले म्हणाले.

प्रत्येक प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणू नये

लव्ह जिहाद बाबत बोलताना ते म्हणाले, अनेकदा एकमेकांची जात पात माहित नसताना मुलं मुली एकत्र येतात. एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते. कित्येक प्रकरणात धर्म जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणू नये. हिंदू मुलगी किंवा दलित मुलगी असेल व मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असे आपले मत आहे. ज्या वेळी कायदा बनेल त्यावेळी त्यात तशी तरतूद असावी. असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेSanjay Rautसंजय राऊतNeelam gorheनीलम गो-हेPoliticsराजकारणMahayutiमहायुतीShiv Senaशिवसेना