शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल; अजितदादांचा शब्द, मानकरांचा राजीनामा मागे

By राजू इनामदार | Updated: October 18, 2024 15:29 IST

अजितदादांनी शब्द दिल्यावर राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी सांगितले

पुणे: विधानपरिषदेवर संधी दिली नाही म्हणून राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अचानक त्यांनी आपली राजीनाम्याची तलवार म्यान केली. पवार यांनी पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक नियोजनासाठी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मानकर यांच्या समर्थनासाठी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे जाहीर केले होते. कोणाचाही राजीनामा मंजूर करणार नाही असे पवार यांनी सांगितले असल्याची माहिती मानकर यांनी दिली. आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला. त्यामुळे राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार आहे असे ते म्हणाले.

मानकर यांना विधानपरिषदेवर घ्यावे अशी मागणी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली होती. ती मान्य झाली नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले होते. स्वत: मानकर यांनीही दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत आपण राजीनामा देणार आहे, प्रामाणिकपणे काम करूनही पक्ष विचारत नसेल तर दुसरा काही पर्याय नाही असे ते म्हणाले होते. मात्र आता त्यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर आपला निर्णय बदलला आहे.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणVidhan Parishadविधान परिषदSocialसामाजिक