शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:35 IST

‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना सुनावले.

बारामती : बारामती शहर परिसरात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते यांनी काही कामं झाली नसल्याची तक्रार केली. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही क्षण संतप्त झाल्याचे पहावयास मिळाले. ‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना सुनावले.बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांचे भाषण सुरू असतानाच विकासकामे, रस्ते आदींबाबत पवारांची चर्चा सुरू होती. याचवेळी भाषण सुरू असतानाच उपमुख्यमंत्री यांंना काही जणांनी निवेदन दिले. ती निवेदन वाचत अधिकाऱ्यांना पवार यांनी याबाबत सूचना देत संबंधित कामांमध्ये लक्ष देण्यास सांगत होते. यावेळी समोर उपस्थितांमध्ये असणाऱ्या एकाने बरेच महिने झाले काम झाले नाही, असे पवार यांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर दुसऱ्याही कार्यकर्त्याने तोच विषय पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार काहीसे संतप्त झाले. मात्र, यावेळी त्यांनी तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, असे सुनावले. यावेेळी काही क्षण शांतता पसरली.यावेळी कार्यक्रमात खराडवाडी या गावातील काही जण पवार यांच्या नजरेस पडले. त्यावर तेथील नागरिकांनी निवडणुकीत आपल्याला फसविल्याचा उल्लेख अजित पवार यांनी खराडेवाडीतील काहीजण समोर दिसताच त्यांची नावे घेऊन केला. पण पुन्हा ती नाराजी सावरत त्यांनी आपले शब्द आवरले आणि जाऊ द्या, मला माणूस दिसला की आठवतं, असं म्हणत ताटात पडले काय आणि वाटीत पडले काय, असे ते म्हणाले.काही काळानंतर सगळ्याचा विसर पडेल, असे देखील पवार यांनी यावेळी नमूद केले. पाच वर्षांत अशी कामे करायची की, कुणाच्याही टर्ममध्ये एवढी कामे झाली नाहीत. अशी कामे आपण केली पाहिजेत. आपल्याला करायची आहेत, असे यावेळी पवार म्हणाले. तसेच काही जण कामे घेऊन दुसऱ्याला विकतात, असले प्रकार चालू देणार नाही. स्वत: कामे करणे शक्य असणाऱ्यांनीच कामे घ्यावीत, ती देखील दर्जेदार करावीत, अशा कानपिचक्या देखील टक्केवारीवर इतरांना काम देणाऱ्या ठेकेदारांना पवार यांनी दिल्या.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळे