Junnar Nagar Parishad Election Result 2025 : जुन्नर नगरपालिकेत शिंदे गटाची सरशी; सुजाता काजळे नगराध्यक्षपदी विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:31 IST2025-12-21T17:30:57+5:302025-12-21T17:31:57+5:30
सुजाता काजळे यांना ५,१४६ मते मिळाली, तर स्नेहल खोत यांना ४,८६४ मते मिळाली. राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार राहीन कागदी यांना मिळालेली ३,८७६ मते निर्णायक ठरली.

Junnar Nagar Parishad Election Result 2025 : जुन्नर नगरपालिकेत शिंदे गटाची सरशी; सुजाता काजळे नगराध्यक्षपदी विजयी
जुन्नर : आमदार शरद सोनवणे व माजी आमदार अतुल बेनके यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवार सुजाता मधुकर काजळे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहल खोत यांचा २८२ मतांनी पराभव केला. सुजाता काजळे यांना ५,१४६ मते मिळाली, तर स्नेहल खोत यांना ४,८६४ मते मिळाली. राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार राहीन कागदी यांना मिळालेली ३,८७६ मते निर्णायक ठरली.
निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी चरण कोल्हे यांनी निकाल जाहीर केला. नगरसेवकांच्या २० जागांसाठी झालेल्या लढतीत शिवसेना (शिंदे गट) ने ८ जागा मिळवत आघाडी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला ६ जागा, भाजपला २ जागा, शिवसेना (ठाकरे गट) ला १ जागा, एक काँग्रेस तर २ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.
नगराध्यक्षपदाच्या चुरशीच्या लढतीत सुजाता काजळे यांनी पहिल्या फेरीत १७२, दुसऱ्या फेरीत १७६ अशी आघाडी कायम ठेवत तिसऱ्या फेरीअखेर एकूण २८२ मतांची निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला.
---
प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग १ : राजश्री खोंड, मंदार बुट्टे पाटील
प्रभाग २ : अलका फुलपगार, प्रशांत सराईकर,
प्रभाग ३ : राहीन कागदी, अकिब इनामदार
प्रभाग ४ : सुवर्णा जाधव, मयूर महाबरे
प्रभाग ५ : अनुजा पातूरकर, समीर पुरवंत
प्रभाग ६ : अनिल रोकडे, वैष्णवी पांडे
प्रभाग ७ : अंजली शिंदे, नरेंद्र तांबोळी
प्रभाग ८ : रुपाली परदेशी, विक्रम (दादू) परदेशी
प्रभाग ९ : सना मन्सुरी, सय्यद मोहम्मद साकी मोहम्मद
प्रभाग १० : मुमताज बानो रिजवान पटेल, वाजीद इनामदार
...................
घडामोडी
माजी नगराध्यक्ष भारती मेहेर, माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, फिरोज खान पठाण, भाऊसाहेब कुंभार, जमिरखान कागदी, समीर भगत, वैष्णवी चतूर, मधुकर काजळे, मोनाली म्हस्के यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
माजी नगराध्यक्ष शाम पांडे यांच्या पत्नी वैष्णवी पांडे या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक ६ मधून अवघ्या ४ मतांनी विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक ४ मध्ये मयूर महाबरे यांनी प्रतिस्पर्धी अभिजित रोकडे यांच्यावर तब्बल ८०० मतांनी मोठा विजय मिळवला. विजयी मिरवणुकांदरम्यान ढोल-ताशांमध्ये घंटांचा वापर व जेसीबीवरून गुलाल उधळल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
“या विजयाचे श्रेय शहरातील सुज्ञ मतदारांना जाते. आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून जुन्नर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न राहील. निवडणुकीपूर्वी मांडलेल्या विकासाच्या व्हिजननुसारच पुढील कामकाज केले जाईल. -सुजाता काजळे, नगराध्यक्ष