‘आरक्षणासाठी आता ६ जूनची डेडलाईन अन्यथा..’; जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 01:32 PM2024-04-08T13:32:50+5:302024-04-08T13:34:02+5:30

माध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, आरक्षण देतो, असे सांगून आम्हाला धोका दिला.

"June 6 is the deadline for reservation, otherwise..", Manoj Jarange Patil | ‘आरक्षणासाठी आता ६ जूनची डेडलाईन अन्यथा..’; जरांगेंचा सरकारला इशारा

‘आरक्षणासाठी आता ६ जूनची डेडलाईन अन्यथा..’; जरांगेंचा सरकारला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : ‘राज्यातील सरकारने आम्हाला सहा जूनपर्यंत आरक्षण नाही दिले, तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. रविवारी ते पुण्यात होते. त्यांनी समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. 

माध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, आरक्षण देतो, असे सांगून आम्हाला धोका दिला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल. माझा मार्ग राजकीय नसल्याने मी आरक्षणाच्या ध्येयावर ठाम आहे. सरकारने मला त्रास दिला. ते त्यांना या निवडणुकीत जड जाणार आहे.   

Web Title: "June 6 is the deadline for reservation, otherwise..", Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.