शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे पाठोपाठ कथित पत्रकार देवेंद्र जैनला गुन्हे शाखेकडून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 21:40 IST

संबंधित गुन्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र बर्हाटे, यांच्यासह १३ जणांवर गुन्हा मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

पुणे : जमीन बळकावणे, धमकाविणे, खंडणी अशा विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर मोक्काखाली कारवाई केल्यावर फरार झालेला पत्रकार देवेंद्र जैन याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या ऑक्टोंबरमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे याच्यासह १३ जणांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. तेव्हापासून तो फरार होता.

रवींद्र बर्हाटे या टोळीप्रमुखाने देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व इतरांच्या सहाय्याने अनेकांना जमीन व्यवहारात फसवणूक केली. त्यांच्या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यांना दमकावून खंडणी वसुल केली आहे. या टोळीवर असे १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात देवेंद्र जैन याच्याविरुद्ध बंडगार्डन, कोथरुड, हडपसर, समर्थ, हडपसर, चतु:श्रृंगी असे ८ गुन्हे दाखल आहेत. त्यातील हडपसर आणि चतु :श्रृंगीच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन देवेंद्र जैनसह चौघांना अटक केली होती. या गुन्ह्यात देवेंद्र जैन याला जामीन मिळाला होता. हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली. त्यानंतर देवेंद्र जैन फरार झाला होता.

या टोळीचा प्रमुख रवींद्र बर्हाटे याची पत्नी, मुलगा यांना पोलिसांनी अटक केली. दीड वर्षे फरार असलेला रवींद्र बर्हाटे हा पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर आता देवेंद्र जैनसमोरही पर्याय न राहिल्याने आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत हजर झाला. पोलिसांनी त्याला हडपसरच्या गुन्ह्यात अटक केली आहे........

राजस्थान, गुजरातपर्यंत पळालादेवेंद्र जैन हा पुण्यातून पळून गेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लपून रहात होता. तोकाही दिवस अहमदनगर, ठाणे येथे राहिला होता. त्यानंतर राजस्थान, गुजरातमध्ये काही दिवस राहिला. तेथून तो हैदराबाद येथे गेला होता. असे त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पुढे आले आहे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक