काम बंद आंदोलनात प्राध्यापक सामील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:54 IST2018-10-03T23:54:07+5:302018-10-03T23:54:35+5:30

जाधव महाविद्यालयाचे शिक्षक : विद्यार्थ्यांकडूनही समर्थन

Join the professor of work-off agitation | काम बंद आंदोलनात प्राध्यापक सामील

काम बंद आंदोलनात प्राध्यापक सामील

आळेफाटा : वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनात आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील प्राध्यापक सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विविध मागण्यांसाठी प्राध्यापक गेल्या १० दिवसांपासून संपावर गेले आहेत.

पाच वर्षांपासून रिक्त असलेली पदे त्वरित भरली जावीत, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी, मागील संपकाळातील रोखलेले ७१ दिवसांचे वेतन अदा करावे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्यसरकारी कर्मचाºयांबरोबरच महाविद्यालयीन प्राध्यापकांना एकाच वेळी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी एम फुक्टो संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. बंदला आळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही पाठिंबा दिला आहे. बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Web Title: Join the professor of work-off agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे