सहकारनगर येथे जलतरण तलावात बुडून जीम ट्रेनरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 14:50 IST2018-07-09T14:49:06+5:302018-07-09T14:50:51+5:30
सहकारनगर येथील महापालिकेच्या कामगार कल्याण जलतरण तलावात पोहत असताना बुडून जीम ट्रेनरचा मृत्यू झाला़.

सहकारनगर येथे जलतरण तलावात बुडून जीम ट्रेनरचा मृत्यू
पुणे : सहकारनगर येथील महापालिकेच्या कामगार कल्याण जलतरण तलावात पोहत असताना बुडून जीम ट्रेनरचा मृत्यू झाला़. सुरज शरद गायकवाड (वय २८, रा़ राजीवगांधी नगर, बिबवेवाडी) असे या जीम ट्रेनरचे नाव आहे़. ही घटना रविवारी (दि.८ सकाळी साडेआठ वाजता घडली़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज गायकवाड हा गेली ८ वर्षे जीम ट्रेनर म्हणून काम करत होता़. सहकारनगर येथील महापालिकेच्या कामगार कल्याणच्या जलतरण तलावात सुरज हा दर रविवारी पोहण्यासाठी येत असत. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी तो मित्राबरोबर पोहायला आला होता़. त्याने तलावात दोन राऊंड मारले़. त्यानंतर तिसरा राऊंड मारत असताना साडेपाच फुटामध्ये अचानक तो तळाला गेला़. हे पाहून प्रशिक्षकाने त्याला तातडीने बाहेर काढले व प्रथमोपचार केले़. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात नेले़. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले़. सुरज याचा नुकताच विवाह झाला होता़. सहायक पोलीस निरीक्षक बी़. एऩ. पोटकुले हे अधिक तपास करत आहेत़.