शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: चामुंडामाता मंदिरातील दागिनेचोरी उघड, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 12:58 IST

आरोपी दागिन्याची चोरी करुन साथीदारासह पसार झाला होता...

धनकवडी (पुणे) : गडद रात्रीच्या अंधारात, तोंडाला कपडा गुंडाळून मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी करुन साथीदारासह पसार झाला होता. त्या आरोपीला नवरात्री उत्सवात ताब्यात घेण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. सुनिल आण्णा कांबळे, (वय ३६ वर्षे, धंदा मंडप बांधणे, रा. रामनगर, बापुजी बुवा चौक, वारजे) असे मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपी चे नाव आहे. 

आरोपीवर तब्बल ५० पेक्षा अधिक घरफोडी व चोरीचे तसेच डबल खूनाचे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये सन २०१८ पासून जेलमध्ये होता. आता तो मार्च २०२३ मध्ये जामीनावर बाहेर आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत भिलारवाडी कात्रज घाटा तील वळणाजवळ चामुंडाभवानी माता मंदीर असून मंदीरामध्ये (दि. २२ आँगस्ट ) २,६०,०००/- रु किमंतीच्या देवीच्या दागिन्याची चोरी झाले होती.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये रोशन ऋषीराज दाहाल (वय-३३ वर्षे, धंदा-पुजारी रा चामुंडा भवानीमाता मंदिराचे मागे, राज टावर, सी-विंग, भिलारेवाडी, कात्रज) यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपास करत असताना भारती विद्यापीठ शोध पथकाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, आरोपी घटनेच्य दिवशी, तोंडाला कपडा गुंडाळून मंदीराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत देवीला सांष्टांग दंडवत घालून मंदीरातील देवीच्या दागिन्याची चोरी करुन साथीदारासह पसार झाला होता.

दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन शोध पथकातील महेश बारावकर, निलेश ढमढेरे, चेतन गोरे यांनी आरोपीच्या मंदीरातील हालचाली व सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने आरोपी सुनिल कांबळे, यास अटक केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस