शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतील मोबाईल टॉवर केला सील

By admin | Updated: March 24, 2017 04:00 IST

जेजुरी नगरपालिकेची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची वसुलीची मोहीम सुरू आहे.

जेजुरी : जेजुरी नगरपालिकेची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करांची वसुलीची मोहीम सुरू आहे. त्याअनुषंगाने थकबाकीदार असलेल्या भारती सेल्युलर प्रा.लि. या मोबाईल कंपनीचा टॉवर बुधवारी (दि. २२) सील करण्यात आला. मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी ही कारवाई केली.तीन आठवड्यांपासून जेजुरी नगरपालिकेची करवसुलीची धडक मोहीम सुरू आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्री वाजवून करभरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुख्याधिकाऱ्यांसह अधिकारी-कर्मचारी वर्गाने शासकीय सुट्या रद्द करून करवसुलीला प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत ५४ मोठ्या थकबाकीदारांची नावे मुख्य चौकांतील फ्लेक्सवर झळकावून ४४ जणांना मालमत्ताजप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. २७५ नागरिकांची नळ कनेक्शन तोडण्यात आली आहेत. एवढे प्रयत्न करूनही केवळ ४५ टक्केच करवसुली झाली असल्याने आता नगरपालिकेने मालमत्ता सील करण्याच्या कारवाईला सुरुवात केली आहे. एका खासगी मालकांच्या इमारतीवर भारती सेल्युलर कंपनीचा मोबाईल टॉवर असून, करभरणा न केल्याने हा टॉवर सील करण्यात आला आहे. पुढील काळात काही खासगी मालमत्ताजप्तीच्या व सील करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले. (वार्ताहर)