शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

जेईई परीक्षेचा निकाल जाहीर, पुण्याचा शरद भट देशात ३१ वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 9:36 PM

जेईई मेन्सची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांचा ३६० गुणांची परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्यात आली होती.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातून दिड लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिलीगेल्या १६ वर्षात जेईई निकालाचा कटआॅफ पहिल्यांदाच इतका खाली घसरला

पुणे : सीबीएसईकडून इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच जेईईचा कटआॅफ खूप घसरल्याचे दिसून येत आहे. या परीक्षेत पुण्याचा शरद भट देशात ३१ वा तर अर्णव दातार ४१ वा आला. जेईई मेन्सची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांचा ३६० गुणांची परीक्षा ८ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेचा कटआॅफ सर्वसाधारण गटासाठी ७४, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) ४५, अनुसूचित जाती (एससी) २९, अनुसूचित जमाती (एसटी)२४  असा घसरला आहे. जेईई मेन्सचे तिन्ही पेपर खूपच अवघड काढण्यात आले असल्याने हा कट आॅफ खाली आहे. जेईई मेन्स परीक्षेसाठी देशभरातून १० लाख ४६ हजार विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २ लाख २४ हजार विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत पुण्यातील शरद भट ३१ वा, अर्णव दातार ४१ वा, अनुज श्रीवास्तव या विद्यार्थ्यांने ६६ वा, चिन्मय भारती या विद्यार्थ्याने १९७ वा रँक प्राप्त केला आहे.    परीक्षेच्या निकालाबाबत जेईई परीक्षांचे मार्गदर्शक दुर्वेश मंगेशकर यांनी सांगितले,‘‘जेईईच्या रसायनशास्त्र, गणित हे दोन पेपर खूपच अवघड काढण्यात आले होते. त्यातील प्रश्न दिलेल्या ३ तासांच्या वेळेत सोडविणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नव्हते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण सोडविता आला नव्हता. त्यामुळे गेल्या १६ वर्षात जेईई निकालाचा कटआॅफ पहिल्यांदाच इतका खाली घसरला आहे.’’महाराष्ट्रातून दिड लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिली होती, त्यापैकी ३० हजार विद्यार्थी हे पुण्यातील होते. त्यापैकी १ हजार विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यात यश आले आहे. या परीक्षेचे पेपर खूप टफ काढण्यात आल्याने २९ हजार विद्यार्थ्यांना यामध्ये अपयश आले. 

सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे आहेजेईई मेन्स परीक्षेमध्ये पुण्याचा अर्णव दातार देशात ४१ वा आला आहे. त्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हायचे असल्याचे त्याने सांगितले. त्याचे वडील कॉग्नीझंट कंपनीत नोकरीला आहेत तर आई टाटा रिसर्च इन्टिटयूटमध्ये कार्यरत आहे. परीक्षेच्या तयारीसाठी त्याने दिवसातून ६ ते ७ तास अभ्यास केला. तो अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याचे हायस्कूलचे शिक्षण बिशप स्कूलमधून झाले आहे.

जेईई निकालाचा कट आॅफ घसरला          कट आॅफचा तक्तावर्ष    खुला गट  ओबीसी  एससी   एसटी२०१३    ११३          ७०      ५०    ४५२०१४    ११५           ७४       ५३    ४७२०१५    १०५           ७०       ५०    ४४२०१६    १००            ७०  ५२    ४८२०१७    ८१            ४९    ३२    २७२०१८    ७४           ४५         २९    २४

अर्णव दातार 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीexamपरीक्षा