बारामती - स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची देण्याच्या मागणीसाठी बारमतीत मराठा क्रांती मोर्चासह सर्व धर्मियांचा विराट जनआक्रोश मोर्चा पार पडला.यामध्ये हजारोंच्या संख्येने सर्वर्धमिय नागरीक सहभागी झाले होते. सकाळी ९ च्या सुमारास कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून मोर्चाला सुरवात झाली.यावेळी मोर्चामध्ये पुढे स्व.संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख,कन्य वैभवी देशमुख तसेच अन्य देशमुख कुटुंबिय सहभागी झाले होते.तसेच यावेळी बारामतीत दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करुन मोर्चाला सुरवात झाली.त्यानंतर मोर्चा गुणवडी चाैक,मारवाड पेठ,सुभाष चाैक मार्गे भिगवण चाैकात पोहचला.यावेळी दोन मुलींसह मोर्चामध्ये पुढे स्व.संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख,कन्य वैभवी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना मराठा क्रांती मोर्चा आणि समस्त सर्वर्धमिय बारामतीकरांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मस्साजोग येथील सरपंच कै संतोष पंडीतराव देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी माणुसकीला काळीमा फासणार्या पध्दतीने निर्घृण हत्या करण्यात आली.या खटल्यातील आरोपींना कशाचेच भय राहिलेले नाही.
आरोपींची मोठी दहशत असल्याने ते साक्षीदारांवर दबाव निर्माण करु शकतात.त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा.फरार आरोपीला तत्काळ अटक करावी,अन्य सहआरोपींच्या विरोधात गंभीर दखल घेवून गुन्हा दाखल करावा.आरोपींना जेलमध्ये देण्यात येणारी शाहि वागणुक बंद करावी.अटक गुन्हेगारांना त्या जिलह्यात न ठेवता दुसर्या जिल्हा कारागृहात ठेवावे.जेणे करुन ते स्वत:चे गुुन्हेगारी साम्राज्य चालवू शकणार नाहीत.जास्तीत जास्त पुरावे देवून आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी,अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. ...या फलकानी वेधले लक्षदेशमुख कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे,कर्तव्यात कसुर करणार्या पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना सहआरोपी करावे,स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येेमागे कट रचल्याप्रक़रणी वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी,धनंजय मुंडे यांच्या हस्तक्षेपामूळे सहआरोपी करा.कराड यांंच्या आर्थिक व्यवहार व संपत्तीची इडी मार्फत चाैकशी करवी.देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग गावाला पोलीस संरक्षण द्यावे,यमसदनाच्या यातना देणार्या नराधमांना यमसदनीच पाठवा, नही चलेगी अब दादागिरी नहि चलेगी, अवाज दिला लेकीले समाज आला लाखाने या फलकांसह मोर्चत धनंजय मुंडे यांच्या विरोधी घोषणा देत रोष व्यक्त करण्यात आला.