शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

26 जानेवारीपासून येरवडा कारागृहात 'जेल-पर्यटन'; गृहमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 12:24 IST

'Jail-tourism' in Yerawada :  राज्यातील कारागृहे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या घटनांचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जतन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये ‘प्रिझन टुरिझम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

मुंबई : भारतात पहिल्यांदाच कारागृहात पर्यटनाची महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. 26 जानेवारीला येरवडा कारागृहात 'जेल-पर्यटन' सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

 पुण्यातील येरवडा कारागृहात २६ जानेवारीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 राज्यातील कारागृहे स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. या घटनांचे संदर्भ कारागृह प्रशासनाकडून जतन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक घटनांमधून प्रेरणा मिळावी, यासाठी कारागृहांमध्ये ‘प्रिझन टुरिझम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. येरवडा, ठाणे, नाशिक कारागृहात स्वातंत्र्यलढ्यात अनेक घटना, प्रसंग घडले आहेत. राष्ट्रीय पुढाऱ्यांनी या कारागृहांमध्ये शिक्षा भोगली आहे. त्या अनुषंगाने संबंधित कोठड्यांचे जतन करण्यात आले आहे. हा प्रेरणादायी इतिहास समजून घेण्यासाठी काराग-ह पर्यटन उपयुक्त ठरु शकते, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक सुनिल रामानंद यांनी ‘लोकमत’ला दिली.

विद्यार्थ्यांच्या सहली, सर्वसामान्य नागरिकांना जेलयात्रेची परवानगी दिली जाणार असल्याचे रामानंद यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, तुरुंगांमध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक ठेवा आहे. तो नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी कारागृह प्रशासनाने प्रस्ताव तयार केला असून तो राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्याला मान्यता मिळताच ही योजना सर्वप्रथम पुणे, नाशिक रोड आणि ठाणे कारागृहात राबविण्यात येणार आहे.

तुरुंगांचे ऐतिहासिक मोल

१) नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह : साने गुरुजी सन १९३२ मध्ये या ठिकाणी अटकेत होते. ‘खरा तो एकची धर्म’ या कवितेचे तसेच मराठीतील अजरामर साहित्यात नोंद असलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे लेखन सानेगुरुजींनी याच कारागृहात केले. त्यांच्या नावे येथे कक्ष करण्यात आला आहे.

३) ठाणे कारागृह : क्रांतीकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशकात इंग्रज अधिकारी जॅकसन याची हत्या केली. त्यांच्यासह कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांना या कारागृहात १९ एप्रिल १९१० रोजी फाशी देण्यात आली.

ऐतिहासिक आठवणींची खाण : येरवडा कारागृहमहात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऐतिहासिक ‘पुणे करार’ पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात जेथे झाला त्याला ‘गांधी यार्ड’ असे नाव देण्यात आले असून तत्कालीन संदर्भांचे जतन करण्यात आले आहे. लोकमान्य टि‌‌ळकांची कोठडी येथे आहे. बँरीस्टर मोतीलाल नेहरु, पंडित जवाहरलाल नेहरु, सरोजिनी नायडु, वल्ल्भभाई पटेल, सुभाषचंद्र बोस येथे अटकेत होते. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यार्डही येथे आहे. बाळासाहेब ठाकरे या तुरुंगात होते.

टॅग्स :jailतुरुंगPuneपुणेtourismपर्यटनAnil Deshmukhअनिल देशमुख