शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

जय हरी विठ्ठल! आषाढी वारी सोहळ्याची मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 23:02 IST

तीर्थक्षेत्र अलंकापुरीत माऊलींच्या चलपादुका मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या संजीवन समाधीवर विराजमान करून मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या १९० व्या आषाढी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

आळंदी : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत माऊलींच्या चलपादुका मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात असलेल्या संजीवन समाधीवर विराजमान करून मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या १९० व्या आषाढी सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.  कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करत निवडक संबंधित वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे माऊलींची आषाढी वारी निवडक चाळीस वारकऱ्यांसह माऊलींच्या चलपादुका घेऊन बसद्वारे पंढरीला गेली होती. चालू वर्षी माऊलींचा सोहळा ३२ दिवसांऐवजी पौर्णिमेनंतर काल्याचा कार्यक्रम करून पंढरीहून स्वगृही परतला होता. त्यानंतर आळंदीत दाखल झालेल्या माऊलींच्या चलपादुकांना कारंज्या मंडपात विराजमान करून त्या ठिकाणी पादुकांना दैनंदिन नित्योपचार करण्यात आले आहेत.तत्पूर्वी मंगळवारी (दि.०३) विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पादुकांना पवमान अभिषेक, दुधारती व महापुजा संपन्न झाली. सायंकाळी वीणामंडपात चक्रांकित महाराजांच्या वतीने नियमित सुरू असलेली ह.भ.प. जगदीशशास्त्री जोशी यांची कीर्तन सेवा पार पडली. प्रथेप्रमाणे चोपदारांनी देव आल्याची वर्दी दिल्यानंतर चक्रांकित महाराजांची दिंडी देवाला सामोरे गेली. टाळ - मृदुंगाच्या निनादात तसेच 'ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या' जयघोषात मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून वीणामंडपमार्गे कारंज्या मंडपातून माऊलींच्या चलपादुका गाभाऱ्यात नेण्यात आल्या.  "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय" असा जयजयकार करत पादुकांना माऊलींच्या संजीवन समाधीसमोर विराजमान करण्यात आले. त्यानंतर परंपरेनुसार माऊलींना पिठलं - भाकरीचा महानैवेद्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मूळपीठ देवस्थानतर्फे श्री. चक्रांकित महाराज यांनी अर्पण केला. विधिवत आरती घेऊन आषाढी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

 याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे - पाटील, प्रमुख विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, ह.भ.प. चक्रांकित महाराज, चैतन्य महाराज कबीरबुवा, योगीराज कुऱ्हाडे, माऊली गुळुंजकर,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह अन्य निवडक वारकरी उपस्थित होते. 

बुधवारी (दि.०४) कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या संजीवन समाधीला पहाटे पवमान अभिषेक, दुधारती व महापुजा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पंढरीच्या आषाढी एकादशीनंतर असलेल्या कामिका एकादशीनिमित्त हजारो वारकरी अलंकापुरीत माऊलींच्या दर्शनाला येतात. मात्र सध्या शासनाच्या आदेशानुसार भाविकांसाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी भाविकांनी दर्शनाला येऊ नये असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर