Pune: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या मार्गावर यवतमध्ये स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 19:24 IST2023-07-10T19:23:01+5:302023-07-10T19:24:32+5:30
पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावल्यानंतर परिसरातील भाविकांनी रांगा लावून पालखीचे दर्शन घेतले...

Pune: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या मार्गावर यवतमध्ये स्वागत
यवत (पुणे) : हरिनामाचा जयघोष करत परतीच्या मार्गावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे यवत (ता. दौंड) येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. सोमवारी (दि. १०) सकाळी पालखी सोहळा वरवंड येथील मुक्काम आटोपून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारच्या विश्रांतीसाठी ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावला. यावेळी यवत ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यासमवेत असलेल्या वारकऱ्यांना दुपारची मेजवानी दिली.
पालखी सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरात विसावल्यानंतर परिसरातील भाविकांनी रांगा लावून पालखीचे दर्शन घेतले. तर समवेत असणाऱ्या वारकऱ्यांनी मंदिर व परिसरात विश्रांती घेतल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळा मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी गावातील ग्रामस्थ श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.