शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम निमगाव केतकी येथे विसावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 23:22 IST

ग्रामस्थांनी विविध उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सेवा व सुविधा दिल्या.

निमगाव केतकी, लोकमत न्यूज नेटवर्क: हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' अशा भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माउली तुकाराम' च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सणसर  येथून पहाटे निघालेला जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा गजर करत  तब्बल २४ किलोमीटर अंतराचा मोठा टप्पा पार करत आज शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजता नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी येथे मुक्कामासाठी विसावला.

पालखी सोहळा सवंदडी च्या माळावर आल्यानंतर गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थांच्यावतीने सरपंच प्रवीण डोंगरे, तात्यासाहेब वडापुरे, दादासाहेब शेंडे, सचिन जाधव, अमोल हेगडे, संतोष घनवट, मच्छिंद्र आदलिंग ,बाबासाहेब भोंग ,सोमनाथ आदलिंग ,महादेव पाटील ,धनंजय राऊत, सुरेश गुरव, मंगेश घाडगे ,नारायण राऊत,संतोष भागवत व मान्यवरांनी पालखीचे मोठ्या भक्तीभावाने स्वागत केले.

ग्रामस्थांनी विविध उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सेवा व सुविधा दिल्या.गावकरी मंडळींनी बाजार पटांगणावरती, सुवर्णयुग पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष दशरथ डोंगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, अष्टविनायक पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष देवराज जाधव व त्यांच्या सहकार्याने, सुवर्णयुगेश्वर पतसंस्था व सुवर्णयुग टुस्टच्या वतीने अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी,  केतकेश्वर पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष गोरख आदलिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी, जनहित पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष अस्लम मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, कै. सोपानराव भोंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संदीप भोंग,रणजीत भोंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी जय भवानी महिला पतसंस्थेच्या वतीनेअध्यक्ष अनुराधा हिंगाणे व त्यांच्या सहकार्‍यांनी, इंदापूर शिक्षक समिती, गुरुसेवा बचत गट या सर्वांच्या वतीने  मोठ्या प्रमाणात वाटकऱ्यांना अन्नदान, सरबत, दूध व पाणी वाटप करण्यातआले. मुस्लीम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुख्तार मुलाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरखुर्मा वाटप केले. अनेक पान उत्पादक शेतकऱ्यांनी विडयांच्या पानाचे वाटप केले.     ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन गुजर यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा देण्यात आली.चंद्रकांत पाटील व समर्थ युवा फाउंडेशन व जानाईलक्ष्मी महिला पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दादाराम शेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, वैष्णवी चॅरिटेबल ट्रस्ट व गणेश पतसंस्था यांच्यावतीने अध्यक्ष किशोर पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा पुरविली.

दरम्यान, वाटेत शेळगाव  फाटा येथे सरपंच उर्मिला शिंगाडे, ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, छत्रपतीचे संचालक विठ्ठल शिंगाडे, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. गोतोंडी येथे सरपंच मनिषा पोपट नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव,  गुरुनाथ नलवडे, अप्पा मारकड, काशिनाथ शेटे व ग्रामस्थांनी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

टॅग्स :Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीsant tukaramसंत तुकारामashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारी