शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

बालभारती ते पाैडराेडची वाट बिकटच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 20:40 IST

बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे.

पुणे :  बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. त्यामुळे काेथरुडवासीयांना अजून काही वर्षे वाहतूक काेंडीतच अडकून पडावे लागणार अाहे.     सुमारे 15 वर्षांपासून बालभारती- पाैड राेड हा रस्ता प्रस्तावित अाहे. या रस्त्याला वेळाेवेळी पर्यावरणवादी अाणि विधी महाविद्यालयाने केलेल्या विराधामुळे हा रस्ता कागदावरच राहिला अाहे. काेथरुडची लाेकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सेनापती बापट रस्त्यावरुन पाैड राेडकडे जाणाऱ्या वाहनांची संख्याही प्रमाणाबाहेर झाली अाहे. सेनापती बापट रस्त्याकडून पाैड राेडकडे जाण्यासाठी लाॅ काॅलेज रस्ता हा एकमेव मार्ग असल्याने या रस्त्यावर  दिवसभर वाहतकू काेंडी असते. सकाळी अाणि संध्याकाळच्यावेळी याठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यातच अाता नळस्टाॅप चाैकात मेट्राेचे काम सुरु करण्यात येणार असल्याने यात अाणखीनच भर पडणार अाहे. दाेन दिवसांपूर्वी मेट्राेच्या कामासाठी प्रायाेगिक तत्वावर कर्वे रस्त्याच्या दाेन्ही बाजूंची एक लेन बंद केल्याने माेठी वाहतूक काेंडी या भागात झाली हाेती. त्यामुळे हा प्रयाेग त्याच दिवशी गुंडाळण्यात अाला. तसेच या भागात काही महिन्यांपूर्वी करण्यात अालेला चक्राकार वाहतूकीचा प्रयाेगही फसल्याने वाहतूक काेंडी कशी फाेडता येईल या प्रश्नात मेट्राे प्रशासन अाणि वाहतूक पाेलीस पडले अाहेत. त्यातच या वाहतूकीवर ठाेस पर्याय जाेपर्यंत शाेधण्यात येत नाही ताेपर्यंत या भागातील मेट्राेच्या कामाला परवानगी देणार नसल्याचे वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी जाहीर केले अाहे. 

    बालभारती ते पाैड रस्त्यापर्यंत टेकडीच्या कडेने पायवाट अाहे. या ठिकाणावरुन अनेक लाेक ये जा करत असतात. या टेकडीवर काही वर्षांपूर्वी वनविभागाकडून माती धरुन रहावी म्हणून झाडे लावण्यात अाली हाेती. सध्या या ठिकाणी माेठ्याप्रमाणावर घनदाट झाडे अाहेत. त्यामुळे रस्ता करायचा झाल्यास येथील शेकडाे झाडांचा बळी द्यावा लागणार अाहे. या टेकडीवर अनेक नागरिक सकाळी अाणि संध्याकाळच्या वेळी फिरण्यास येत असल्याने तसेच माेरांबराेबरच अनेक पक्षांचा या टेकडीवर अधिवास असल्याने पर्यावरण प्रेमींचा या रस्त्याला विराेध अाहे. ज्या ठिकाणावरुन हा रस्ता हाेणार अाहे त्या ठिकाणी पाण्याची माेठी वाहिनी गेली असल्याने ही वाहीनी हलवावी लागणार अाहेतसेच टेकडीचा काही भाग फाेडून रस्ता तयार करावा लागणार अाहे. त्यासाठी माेठा कालावधी लागण्याची शक्यता असली तरी सध्या अस्तित्वात असलेले तंत्रज्ञान पाहता हा रस्ता लवकरणे सुद्धा शक्य अाहे. त्यासाठी प्रशासनाची इच्छाशक्ती महत्त्वाची अाहे. हा रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेकडून पर्यावरण अाघात मूल्यांकन अाणि वाहतूक अाराखडा तयार करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या निविदा मागविण्यात अाल्या अाहेत. यासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 13 डिसेंबर असून, त्यानंतर लवकरच पर्यावरण अाघात मूल्यांकन व वाहतूक अाराखड्याचे काम सुरु हाेणार अाहे. 

टॅग्स :kothrudकोथरूडMetroमेट्रोTrafficवाहतूक कोंडीenvironmentवातावरण