शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणाकडे कौशल्य आहे हे कळून येईल; अजितदादांचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:57 IST

राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरच काही शिकतील

बारामती : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये जे झालं याबाबत विधान परिषद निवडणुकीमध्ये आम्ही काळजी घेऊ. राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरच काही शिकतील. विधान परिषद निवडणुकीमध्ये अधिक चांगला निकाल कसा येईल हे पाहिले जाईल. या निवडणुकीच्या माध्यमातून कोणाकडे कौशल्य आहे आणि नाही हे सुद्धा कळून येईल,  असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना दिला.

बारामती येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केले. ते पुढे म्हणाले, दिनांक १८, १९, २० तीन दिवस सर्व आमदार मुंबईमध्ये थांबतील, अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. आम्ही सुद्धा आज मुंबईमध्ये जात आहोत. सर्व आमदारांना त्या ठिकाणी बोलावले आहे, अशी माहिती दिली. महाविकासआघाडी मधील काही आमदार नाराज असल्याची सध्या चर्चा आहे, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वांचीच शंभर टक्के कामे होत नसतात सत्तेत असणारा आमदार आपली कामे पुढे नेत असतो त्यामध्ये गैर काहीच नाही.  भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'अजित दादा स्पष्टवक्ते आहेत त्यांनी आमच्या सोबत येऊन सरकार स्थापन करावे' अशी खुली ऑफर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती, यावर माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता, कुणी काही बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही जेथे आहोत त्या ठिकाणी आमचं बरं चालले आहे, असे उत्तर दिले. ओबीसी जनगणने बाबत आज सायंकाळी सहा वाजता बैठक होणार आहे. समान आडनावामुळे ही जनगणना कशा पद्धतीने करता येईल याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठक नुकतीच मुंबई येथे झाली आहे. घटनेनुसार राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च  संविधानीक पद असल्याने या पदाचा व सर्वसामान्य जनतेचा संपर्क कमी होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तिच आमच्या पक्षाची देखील भूमिका होती. आज पर्यंत पवार साहेब सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करत आले आहेत. त्यामध्ये त्यांना समाधान मिळते, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.'' 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण