एकलहरे राहणार आठ दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:29+5:302021-05-15T04:10:29+5:30
आंबेगाव तालुक्यातील २३ गावांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. ही गावे जिल्हाधिकारी यांनी हाय अलर्ट म्हणून घोषित केली आहे. ...

एकलहरे राहणार आठ दिवस बंद
आंबेगाव तालुक्यातील २३ गावांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. ही गावे जिल्हाधिकारी यांनी हाय अलर्ट म्हणून घोषित केली आहे. त्यात एकलहरे हे एक गाव आहे. काही दुकानदार व नागरिकांकडून सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुन्हा काही कडक निर्बंध लादणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यानुसार एकलहरे गावातील कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून एकलहरे येथे दररोज नव्याने रुग्ण आढळत आहे.या पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर खबरदारी म्हणून गावची ग्रामस्तरीय समिती बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात विनाकारण नागरिकांना बाहेर पडण्यास निर्बंध असतील. तसेच या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना या बंद ठेवण्यात येणार आहेत.