शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेहमी घरी येणाऱ्या ‘काका’नेच केला ‘त्या’ विवाहितेचा खून; मृतदेह ठेवला पलंगाच्या बॉक्समध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:38 IST

पोलिसांनी तपास केला असता विवाहितेच्या घरी नेहमी येणारा ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे, तो येऊन गेल्याचे निष्पन्न झाले

पुणे: पती बाहेरगावी गेलेला असताना त्याच्या पत्नीचा खून करून मृतदेह घरातील पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ८) उघडकीस आला होता. या खुनाचे रहस्य उलगडण्यात फुरसुंगी पोलिसांना यश आले आहे. स्वप्नाली उमेश पवार (२४, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) असे मृत महिलेचे नाव आहे. स्वप्नाली हिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. पवार दाम्पत्याच्या घरी नेहमी येणाऱ्या व्यक्तीने (ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे) हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

याबाबत तिचा पती उमेश पवार (३६, रा. हुंडेकर वस्ती, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार त्यांच्या राहत्या घरी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १०:०० ते ८ नोव्हेंबर सकाळी ७:००च्या दरम्यान घडला होता. उमेश पवार हे उबेर टॅक्सीचालक आहेत. त्यांना बीड जिल्ह्यातील केज येथील भाडे लागल्याने ते ७ नोव्हेंबर रोजी रात्री गाडी घेऊन गेले होते. भाडे सोडून सकाळी ते परत घरी आले तेव्हा त्यांना घराला बाहेरून कडी लावलेली दिसली. घरात त्यांची पत्नी नव्हती. त्यांनी परिसरात शोध घेतला तरी ती आढळून आली नाही. घरातील दागिने, पैसे व तिचा मोबाइलही दिसून आला नाही. तेव्हा त्यांनी पलंगाच्या बॉक्समध्ये दागिने व सोने आहेत का? हे पाहण्यासाठी पलंग उघडला, तेव्हा आत स्वप्नालीचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात स्वप्नालीचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास केला असता त्यांच्याकडे नेहमी येणारा ज्याला स्वप्नाली काका म्हणत असे, तो येऊन गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिस त्या ‘काका’चा शोध घेत असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबर करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूWomenमहिलाhusband and wifeपती- जोडीदार