Pune Crime: ‘ती’ चूक नडली, बाप लेकीच्या बँक खात्यातून सात लाख गायब
By भाग्यश्री गिलडा | Updated: October 3, 2023 16:36 IST2023-10-03T16:35:46+5:302023-10-03T16:36:10+5:30
याप्रकरणी गंजपेठ परिसरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे....

Pune Crime: ‘ती’ चूक नडली, बाप लेकीच्या बँक खात्यातून सात लाख गायब
पुणे : बँक खाते ब्लॉक झाले असल्याचे सांगत ओटीपी देण्यासाठी भाग पाडून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंजपेठ परिसरात राहणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हा प्रकार २३ फेब्रुवारी २०२३ आणि २४ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार तक्रारदार यांच्या वडिलांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तुमचे बँकेचे खाते ब्लॉक झाले असे तक्रारदारांच्या वडिलांना सांगण्यात आले. खाते अनब्लॉक करायचे असल्यास एक ओटीपी येईल असे सांगत ओटीपी सांगण्यास भाग पाडले. असे करून बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यातून अधिक ९४ हजार काढून घेतले. त्यांनतर तक्रारदार यांच्या बँक खात्याची माहिती मिळवून त्यांच्या अकाउंटवरून तब्बल ६ लाख रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने पुढील तपास करत आहेत.
६ महिन्यांनंतर गुन्हा दाखल
सदरचा गुन्हा २३ आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडला. त्यानंतर फिर्यादींनी लगेचच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांनतर अखेर सहा महिने उलटून गेल्यावर सोमवारी (दि. ०२) सायबर पोलीस ठाण्याने झिरोने दाखल करून खडक पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.