शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला हजर करणे होतेय अवघड; जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 12:09 IST

दुसरीकडे याच प्रकरणातील चार आरोपी फरार असल्याचेही न्यायालयाने केले घोषित

ठळक मुद्दे मुख्य आरोपी यासीन भटकळची व्हीसीद्वारे सुनावणी

पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाला दहा वर्षे पूर्ण झाली असून, अद्याप त्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यादरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने त्याला वेगळे वळण मिळाले आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे (व्हीसी) येथील न्यायालयात हजर करून खटल्याच्या सुनावणीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे याच प्रकरणातील चार आरोपी फरार असल्याचेही न्यायालयाने घोषित केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सुनावणीसाठी प्रत्येक वेळी हजर करणे अवघड आहे. त्यामुळे भटकळला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करण्यात यावे, असा अर्ज दिल्ली येथील तपास अधिकाºयाने केला होता. यावर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारेच भटकळ याला न्यायालयात हजर करणे योग्य असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यांनी न्यायालयास सांगितले होते. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात १७ व्यक्ती मृत्युमुखी, तर एकूण ५६ लोक गंभीर जखमी झाले होते. मृत्यू झालेल्यांमध्ये ५ आणि जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविला होता. बेकरीत भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सुनावणीसाठी प्रत्येक वेळी हजर करणे अवघड आहे. त्यामुळे भटकळला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करावे, असा अर्ज दिल्ली येथील तपास अधिकाऱ्याने केला होता. यावर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारेच भटकळ याला न्यायालयात हजर करणे योग्य असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयास सांगितले होते. तर, या सुनावणीसाठी भटकळ याला प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. जहीरखान पठाण यांनी केली होती. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBlastस्फोटPoliceपोलिसCourtन्यायालय