शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

चोरांना पाहून पोलिसांनीच पळून जाणे दुर्दैवी : उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 17:48 IST

पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली..

ठळक मुद्देपोलिसांच्या मनोवैज्ञानिक विश्लेषणाची गरज

पिंपरी : पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली. हा केविलवाणा प्रकार आहे. यामुळे पोलिसांची प्रतिमा खराब होते हे दुर्दैवी आहे. याचा इतर पोलिसांच्या मनोबलावर परिणाम होतो. अशा पोलिसांच्या मनोवैज्ञानिक विश्लेषणाची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चिंचवड येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, पोलिसांचे मनोबल उंचावले पाहिजे. हातात केवळ काठी असतानाही तुकाराम ओंबळे या पोलिसाने दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले. अशा शहीद ओंबळेंचा वारसा महाराष्ट्र पोलीस दलाला आहे. जागतिक पातळीवर राज्य पोलीस दलाचा लाैकिक आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला साजेशी कामगिरी करावी. पोलिसांचा वचक सामान्यांवर नव्हे तर गुन्हेगारांवर असावा. त्यांच्याकडे नागरिक विश्वासाने आले पाहिजेत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता पोलिसांनी केली पाहिजे. प्रत्येकाला सुरक्षित वाटेल, असे विश्वासाचे वातावरण निर्माण करावे. 

राज्यातील पोलीस दर काळानुरुप बदलत आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यावर सरकारचा भर आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात २५० कोटींची निवदा काढून प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मोठी भरती करण्यात येऊन पोलिसांची अनेक पदे भरण्यात येतील.   

पोलिसांच्या निष्ठा व कर्तव्याला तोड नाहीगेले वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. हे वर्ष कोरोनामुक्तीचे असेल. कोरोना महामारीच्या सुरवातीच्या टप्प्यातही पोलिसांनी जोखीम पत्करून रस्त्यावर उतरून कर्तव्य बजावले. अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यावर मात करून ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. काहींनी जिवाची पर्वा न करता सेवा केली. त्यामुळे पोलिसांच्या निष्ठा व कर्तव्याला तोड नाही. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसThiefचोर