शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

.....तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 13:53 IST

दोन्ही महापालिकांनी त्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरले नाही तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य आहे.

ठळक मुद्देपीएमआरडीएतर्फे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी टीपी स्किमची निर्मिती पीएमआरडीएने सध्या केवळ पाच टीएमसी पाण्याची केली मागणी

 पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे क्षमतेपेक्षा अधिक पाणी वापरले जात असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेले पाणी सोडण्यास अडचणी येत आहेत. त्यातच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सिंचन विभागाकडे पाच टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. परंतु, दोन्ही महापालिकांनी त्यांना मंजूर असलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी वापरले नाही तर पीएमआरडीएला पाणी देणे शक्य आहे.पीएमआरडीएतर्फे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी टीपी स्किम तयार केल्या जात आहेत. मात्र, या टीपी स्किमला पाणी कुठे उपलब्ध करून देणार असा प्रश्न पीएमआरडीएसमोर आहे. पाण्याची व्यवस्था केल्याशिवाय टीपी स्किमला मान्यता मिळत नाही. त्यामुळे पीएमआरडीएने सिंचन विभागाकडे पाण्याची मागणी केली. परंतु, धरणात पाणी शिल्लक राहत नसल्यामुळे पीएमआरडीएला पाणी देता येणार नसल्याचे सिंचन विभागाने स्पष्ट केले. पीएमआरडीएचे क्षेत्र दोन्ही महापालिकांपेक्षा अधिक असूनही पीएमआरडीएने सध्या केवळ पाच टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. सर्वांनी नियमाप्रमाणे पाणी वापरले तर खडवासला धरण प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातूनच दोन्ही पालिका, पीएमआरडीएला आणि शेतीला पाणी देणे शक्य आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल कालवा समितीसमोर सादर केला आहे.पुणे विभागाचे अक्षक अभियंता संजीव चोपडे, पुणे महापालिकेची लोकसंख्या सुमारे ३९ लाख असून पिंपरी चिंचवडची लोकसंख्या सुमारे २२ लाख आहे.लोकसंख्येनुसार पुणे महापालिकेसाठी सुमारे ८.५० टीएमसी तर पिंपरी चिंचवडने सुमारे ४.५० टीएमसी पाणी वापरणे अपेक्षित आहे. नियमानुसार दोन्ही पालिकांच्या वाटाल्या १२.५० ते १३.०० टीएमसी पाणी येते. मात्र, या दोन्ही पालिकांमधील ६१ लाख लोकांकडून सव्वा कोटी लोकसंख्येचे पाणी वापरले जाते. परिणामी दोन्ही पालिकांकडून क्षमतेपेक्षा दुप्पट पाण्याचा वापर केला जात आहे..........................पालिकेने केले दुर्लक्षदोन्ही पालिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून क्षमतेपेक्षा अधिकच पाणी वापरले जाते. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड पालिकेने टप्प्याटप्प्याने आपला पाण्याचा वापर कमी करावा, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यात पाण्याच्या चोरीला लगाम घालणे, पाण्याची गळती थांबवणे, कालव्याऐवजी थेट धरणातून पाणी उचलणे अपेक्षित आहे. परंतु, पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएWaterपाणीKiran Gitteकिरण गित्तेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका