शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:10 IST

मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली.

पिंपरी : राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी येथील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार, २६ जुलै २०२५) सकाळी सहा वाजता पुन्हा एकदा पाहणी केली. यावेळी त्यांनी हिंजवडीच्या सरपंचांना खडेबोल सुनावले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पाहणी दरम्यान, अजित पवार कारमध्ये बसत असताना हिंजवडीचे सरपंच त्यांच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. यावर अजित पवार म्हणाले, "तुम्हाला काय सांगायचे ते सांगा, मी ऐकून घेतो. मला काय करायचे ते मी करतो. पण आपले वाटोळे झाले आहे. हिंजवडीचे आयटी पार्क पुणे, महाराष्ट्रातून हैदराबाद, बंगळुरूला चालले आहे. मी कशाला सकाळी सहा वाजता येऊन पाहणी करतोय? मला कळत नाही का? माझीही लोक आहेत. पण ते केल्याशिवाय गत्यंतर नाही."

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांमुळे अनेक कंपन्या अन्य शहरांकडे स्थलांतरित होत असल्याची चिंता अजित पवारांनी व्यक्त केली. त्यांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. येत्या काळात या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी, मे महिन्यात झालेल्या पावसाळ्यात आयटी पार्क वॉटर पार्क झाले होते. त्यामुळे आयटीनगरी हिंजवडीतील समस्या ऐरणीवर आल्या आहेत. वाहतूक कोंडी, नागरी समस्या सोडवण्यासाठी अभियंत्यांनी आंदोलने केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी हिंजवडीतील समस्यांची पाहणी केली होती. दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली आहेत का, त्यानुसार विकास कामांना सुरुवात केली आहे का, याची शनिवारी अजित पवार यांनी पाहणी केली.  वाहतूक कोंडी, रस्ते या नागरी समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार शंकर मांडेकर,  विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhinjawadiहिंजवडीAjit Pawarअजित पवारTrafficवाहतूक कोंडी