शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

"साहेबांबद्दल चुकीचा शब्द जाणे अशक्य..." शरद पवारांवरील टीकेनंतर वळसे पाटलांचा 'यु टर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:43 IST

मेळाव्यात वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर वाद झाला होता...

मंचर (पुणे :शरद पवार यांच्याबद्दल माझ्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीही कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर वाद झाला होता.

शरद पवार यांच्या उंचीचा राज्यात एकही नेता नाही असं आपण म्हणतो. परंतु पवार यांच्या एकट्याच्या ताकदीवर राज्यातील जनतेने एकदाही एकहाती सत्ता दिली नाही. उत्तुंग नेता असतानाही आपण ठराविक आमदारच निवडून आणू शकलो. कुणाशी तरी आघाडी करावी लागते. इतर राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी त्या राज्यात सत्ता मिळवली, अशी टीका सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी केली होती.

आधी टीका नंतर दिलगिरी-

याबाबत वादंग निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र या संदर्भात खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली असून शरद पवार यांच्याबद्दल माझ्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीही मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, अशी सष्टोक्ती दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवारांना भेटून वस्तुस्थिती सांगणार-

वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यावर मी टीका केलेली नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली कामगिरी मोठी आहे. त्या तुलनेत राज्यातील जनता ज्या खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभी राहिला हवी होती जो पाठिंबा मिळायला हवा होता तो मिळालेला नाही, अशी खंत मी बोलून दाखवली. शरद पवार यांच्याबद्दल मी आदरच व्यक्त केला आहे व यापुढे करत राहणार आहे. त्यांच्यामुळेच मी सलग ३२ वर्षे आमदार झालो असून अनेकदा मंत्रीपदे मिळाली आहेत.

खंत व्यक्त केली होती-

राज्यातील जनतेने पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे अशी खंत मी बोलून दाखवली. यापूर्वी ही भूमिका मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला गेला नाही. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे,असे सांगून आंबेगाव तालुक्यात शरद पवार आले तर त्यांचे पूर्वीप्रमाणेच कार्यकर्ते जंगी स्वागत करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र