शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्प, प्राण्याच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 7:00 AM

महापालिकेच्या वतीने कात्रज येथे चालविण्यात येणारे सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयाच्या देखभालीसाठी वर्षांला सुमारे १ कोटी ४४ लाख ५३ हजार खर्च येतो.

ठळक मुद्देएक वर्षांपासून देखभालीचा खर्च देण्यास टाळाटाळपन्नास टक्के खर्च हे भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या वतीने विविध देणग्या व अनुदानमधून कात्रज येथील १३० एकर क्षेत्रावर राजीव गांधी प्राणी संग्रहालय विकसित

पुणे: महापालिकेच्या वतीने कात्रज येथे चालविण्यात येणारे सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयाच्या देखभालीसाठी वर्षांला सुमारे १ कोटी ४४ लाख ५३ हजार खर्च येतो. यापैकी पन्नास टक्के खर्च हे काम करणारी भारतीय सर्पविज्ञान संस्थेच्या वतीने विविध देणग्या व अनुदानमधून करण्यात येतो. परंतु उर्वरीत पन्नास टक्के खर्च महापालिकेकडून देणे अपेक्षित असताना केल्या एक वर्षांपासून महापालिकेच्या हिस्स्याचे ७८ लाख ८९ हजार १६२ रुपये संबंधित संस्थेला देण्यास टाळाटाळ सुरु आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. परंतु गुरुवारी (दि.४) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठीकत हा प्रस्ताव केवळ कार्यपत्रिकेवर न घेतल्याने मंजूर झाला नाही. महापालिकेचा भोंगळ कारभार आणि पदाधिका-यांच्या उदासिनतेमुळे कात्रज सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयावर ह्यअनाथह्ण होण्याची वेळ आली आहे.    महापालिकेच्या वतीने कात्रज येथील १३० एकर क्षेत्रावर राजीव गांधी प्राणी संग्रहालय विकसीत करण्यात आले असून, यामध्ये एक भाग सर्पोद्यान व वन्य प्राण्याचे अनाथालय हा आहे. या प्राणी संग्रहालयास वषार्ला सरासरी १८ लाखांहून अधिक नागरिक भेट देतात. यासाठी नागरिकांकडून घेण्यात येणा-या प्रवेश शुल्काची रक्कम अत्यात तुटपुजी असल्याने या प्राणी संग्रहालयावर महापालिकेला आपल्या अंदजापत्रकामधून खर्च करावा लागतो. यामध्ये गेल्या ३३ वर्षांपासून प्राणी संग्रहालयात असलेल्या सर्पोद्यन व वन्य प्राणी अनाथालय देखभालीचे कामकाज भारतीय सर्पविज्ञान संस्थे मार्फत करण्यात येते. महापालिकेच्या स्थायी समितीच्या वतीने  ८ आॅगस्ट २०१५ ते  ७ आॅगस्ट २०१८ या कालावधीसाठी देण्यात आले होते. प्रस्तावाची मुदत संपल्यानंतर कामास मुदत वाढ देणे व गेल्या वर्षभर केलेल्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देणे अपेक्षित होते. परंतु गेल्या एक वर्षांपासून संस्थेचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.    सर्पोद्यानच्या देखभालीसाठी वषार्ला अपेक्षीत खर्च सुमारे ६२ लाख २२ हजार ६९२ इतका आहे. यामध्ये कर्मचा-यांचे वेतन, प्राण्यांचे खाद्य, खाद्य पुरक, प्राण्यांचे पिंजरे, दुरुस्ती, सौंदर्यकरण, प्राण्याचे औषधे व इतर खर्च येतो. यापैकी पन्नास टक्के म्हणजे तब्बल ३१ लाख ११ हजार रुपयांचा निधी संस्था विविध संस्थांकडून मिळणारी  देणग्या व अनुदानमधून करण्यात येतो. तर वन्य प्राणी अनाखालयाच्या देखभालीसाठी वषार्ला सुमारे ८२ लाख ३० खर्च येतो. यापैकी देखील पन्नास टक्के खर्च संबंधित संस्था देणग्या, अनुदानामधून करते. त्यामुळे शिल्लक व महापालिकेच्या वाट्याचा खर्च संबंधित संस्थेला दर वर्षी देणे अपेक्षित आहे. सन २०१८-१९ या वर्षांसाठीचा खर्च सुमारे ७८ लाख ८९ हजार रुपये महापालिकेने संस्थेला देणे अपेक्षित आहे. तसेच हे काम पुढील तीन वर्षांसाठी पुन्हा गेल्या ३३ वर्षांपासून काम करणा-या भारतीय सर्पविज्ञान संस्थेला देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी एक वर्षांचा कालावधी गेला आहे. त्यात आता स्थायी समितीच्या पदाधिका-यांकडून याबात दाखविण्यात येत असलेल्या उदासिनतेमुळे सर्पोद्यान व वन्य प्राण्यावर आनाथ होण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका