शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

चंद्रलोकीचा वेध घेणारे ''विक्रम अन् प्रज्ञान''  सोमवारी पहाटे झेपावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 09:00 IST

चंद्रयान १, मंगळयान आणि अवकाशात एकाचवेळी १०० पेक्षा जास्त उपग्रह सोडून भारताने अवकाश क्षेत्रातील ताकदीवर या पूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी (दि. १५) पहाटे चंद्रयान २ मोहिमेंतर्गत चंद्रावर विक्रम (लँण्डर) आणि प्रज्ञान (रोव्हर)  पाठविले जाणार आहे.

निनाद देशमुख पुणे : चंद्रयान १, मंगळयान आणि अवकाशात एकाचवेळी १०० पेक्षा जास्त उपग्रह सोडून भारताने अवकाश क्षेत्रातील ताकदीवर या पूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी (दि. १५) पहाटे चंद्रयान २ मोहिमेंतर्गत चंद्रावर विक्रम (लँण्डर) आणि प्रज्ञान (रोव्हर)  पाठविले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश भारत ठरणार आहे. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे हा असला तरी या मोहिमेतून भारताच्या येणाऱ्या  अवकाश मोहिमांसाठी हा अनुभव मैलाचा दगड ठरणार आहे.इस्रोने २००८ मध्ये चंद्रयान १ आणि त्यानंतर मंगळयान मोहीम यशस्वी करून अंतराळ क्षेत्रातील आपली ताकद सिद्ध केली. चंद्रयान १ मोहिमेत इस्रोच्या यानाने चंद्रावर बर्फरूपात पाणी असल्याचा शोध लावला होता. याला जगातील पहिल्या क्रमांकाची अवकाश संशोधन संस्था नासानेही दुजोरा दिला होता. यामुळे इस्रोची ‘चंद्रयान २’ मोहीम ही खूप महत्त्वाची ठरते. सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या शक्तिशाली प्रक्षेपास्त्राच्या साह्याने हे यान चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी इस्रोचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा या यानावर असतील. मोहिमेतील सर्व यंत्रणा भारतीय बनावटीची आहे हे विशेष. एक हजार कोटी रुपयांचा खर्च यासाठी झाला आहे. यानाच्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगसाठी चंद्राच्या दक्षिण धु्रवाची निवड केली आहे. समतल प्रदेश असल्यामुळे हा भाग निवडला आहे. या यानाचे वजन जवळपास ३ हजार २५० किलो आहे. याचे तीन भाग आहेत. चंद्रावर उतरण्यासाठी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर तयार केले आहेत. प्रक्षेपणानंतर काही दिवस यान पृथ्वीभोवती फिरणार आहे. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर यान चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. 

बंगळुरुतील मुख्यालयातून नियंत्रणचंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मॅनझिनस सी व  सिमपेलियस एन या विवरांवर हे यान उतरेल.  आर्बिटरमधून लँडर (विक्रम) यान चंद्रावर उतरेल. त्यातून प्रज्ञान रोव्हर हे चंद्राच्या भूपृष्ठावर उतरेल.  प्रज्ञान रोव्हरचे वजन जवळपास २५ ते ३० किलो आहे. चाकांच्या साह्याने ते चंद्रावर चालणार आहे. यानाचे नियंत्रण बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयातून होणार आहे.

इस्रोकडून गगनयान मोहिमेचीही तयारीचंद्रयान १, चंद्रयान २, मंगळयान या बरोबरच येत्या काळात अंतराळात मानव पाठविण्यासाठी गगनयान मोहीम इस्रोने आखली आहे. भारतीय प्रक्षेपक पीएसएलव्ही आणि जीएसएलव्हीच्या साह्याने १०४ अंतरिक्ष मोहिमा आखल्या आहेत. यात ७३ प्रमोचन मिशन, १० विद्यार्थी उपग्रह तसेच ३३ देशांचे २९७ उपग्रह अंतराळात सोडले आहेत.

टॅग्स :Indiaभारत