शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

Pune: इसिसच्या ‘त्या’ दहशतवाद्यांनी दरोडे, चोऱ्यांमधून उभारला निधी; NIAच्या तपासात निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 09:56 IST

महाराष्ट्र आणि गुजरातमधील मेट्रो सिटीमध्ये या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती ‘एनआयए’ने तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर समोर आली आहे...

पुणे : इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या बंदी घातलेल्या संघटनेच्या दहशतवाद्यांनी कोंढवा येथे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तसेच, त्यांनी नियंत्रित पद्धतीत बॉम्बस्फोट घडवून आणले होते. पकडण्यात आलेले दहशतवादी ‘सिक्रेट ॲप’द्वारे परदेशातील हँडलरच्या संपर्कात असल्याचेही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात समोर आले आहे. त्यांनी दरोडे, चोऱ्या करून दहशतवादी कृत्यासाठी निधी उभा केल्याचे व त्यांनी हँडलरकडूनदेखील पैसे घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

महाराष्ट्र आणि गुजरातमधील मेट्रो सिटीमध्ये या दहशतवाद्यांचा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती ‘एनआयए’ने तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर समोर आली आहे. ‘एनआयए’ने मुंबई येथील विशेष न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. प्रशिक्षणादरम्यान आरोपींच्या हस्ताक्षरातील नोंदीदेखील सापडल्या आहेत. आरोपींनी त्यासाठी त्यांनी पश्चिम घाटात रेकी केली होती.

या प्रकरणाच्या तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रात ‘एनआयए’ने चार दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये महंमद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुल्ला शेख आणि तल्लाह लियाकत खान अशा चौघांसह शामील नाचन याच्यावर नव्याने आरोपपत्र दाखल केले आहे. तर, यापूर्वी महंमद इम्रान महंमद युसूफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), महंमद युनूस महंमद याकूब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा, पुणे), समीब नासीरउद्दिन काझी (रा. कोंढवा, पुणे), जुल्फिकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या सगळ्यांवर बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (युएपीए), स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्रास्त्र कायदा तसेच विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या पुरवणी आरोपपत्रानुसार, यातील महमद आलम याला कोथरूड येथून दुचाकी चोरताना कोथरूड पोलिसांनी पकडले होते. पकडण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी तो एक होता. मात्र त्याला कोंढवा येथे तपासासाठी नेल्यानंतर तो तेथून पळून गेला होता. त्यानंतर त्याला २ नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक करून एनआयएकडे पुढील तपासासाठी वर्ग केले होते. आलमला जेव्हा ताब्यात घेण्यात आले तेव्हा त्याच्या पूर्वी सापडलेले कपड्यांवरील नमुने व त्याचे डीएनए सॅम्पल जुळले. पकडण्यात आलेले सर्व दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून दहशतवादी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी पुणे आणि महाराष्ट्रात मोठे दहशतवादी कृत्य करण्याची योजना आखल्याचेही एनआयएने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेISISइसिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाterroristदहशतवादीMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात