ईश्वरदास बंब यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:57 IST2018-08-15T00:57:18+5:302018-08-15T00:57:42+5:30

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 IshwarDas Bamb passed away | ईश्वरदास बंब यांचे निधन

ईश्वरदास बंब यांचे निधन

पुणे - पुण्यातील प्रसिद्ध उद्योगसमूह बाळाराम मार्केटचे सदस्य ईश्वरदास भीकमदास बंब (वय ८६) यांचे मंगळवारी सकाळी ५.५५ मिनिटांनी निधन झाले. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या मागे पत्नी सुशीला, मुलगा प्रशांत, स्नुषा विभा, भाऊ शशिकांत, सूर्यकांत, बहीण इंदुमती चोपडा, मुली ज्योती कांकरीया, सुरेखा मारू, वीणा मेहर, अंजू बरडिया, मंजू झांझरीया, नातवंडे असा परिवार आहे.
माजी राष्टÑपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. वैकुंठात अंत्यसंस्कारप्रसंगी शांतीलाल मुथ्था, सुरेशदादा जैन, डॉ. के. एच. संचेती, पोपटलाल ओस्तवाल, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, देवीदास भन्साळी, प्रवीण चोरबेले आदींनी श्रध्दांजलीपर भावना व्यक्त केल्या.
या वेळी विठ्ठलशेठ मणियार, संजय चोरडिया, डॉ. अरविंद फडके, रमेशदादा जैन, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, अतुल लुंकड, राजा मयूर, मेजर नाना वाणी, विलास राठोड आदी उपस्थित होते.
पुण्यातील सामाजिक आणि धार्मिक कार्यात ईश्वरदास बंब यांचा मोठा सहभाग होता. फ्रीडम थ्रू एज्युकेशन या राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केडगाव, उरळीदेवाची अशा विविध पाच ठिकाणी शाळा बांधुन दिल्या
आहेत. ज्यामुळे आज हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अनाथ मुलांच्या संस्थांना त्यांनी नेहमीच मदत केली. बुधवारी (१५ आॅगस्ट) दुपारी ३ वाजता महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे उठावणा होणार आहे.

Web Title:  IshwarDas Bamb passed away