पुणे : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) भाविकांसाठी ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ या आध्यात्मिक पर्यटन ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही पर्यटन रेल्वे १८ फेब्रुवारी २०२६ रोजी मनमाड येथून प्रस्थान करणार असून, पुण्यातून जाणार आहे. दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडविणार आहे. यामध्ये १२ रात्री व १३ दिवसांच्या समावेश आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे असिस्टंट मॅनेजर संजय शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग, गाैरव आनंद, सत्यश्री सोनवणे आदी उपस्थित होते.
आध्यात्मिक पर्यटनातून भाविकांना श्रद्धा, संस्कृती आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मनमाड, नाशिक रोड, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा आणि मिरज या स्थानकांवरून या रेल्वेत चढण्याची व उतरायची सुविधा देण्यात आली आहे. आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले की, ही विशेष एसी व नॉन-एसी पर्यटन रेल्वे मुरुडेश्वर, गुरुवायूर, रामेश्वरम, मदुरइ, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, कांचीपुरम आणि महाबलीपुरम या धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देणार आहे. मुरुडेश्वर शिवमंदिर, विवेकानंद रॉक मेमोरियल तसेच महाबलीपूरम येथील ऐतिहासिक मंदिरांचा यामध्ये समावेश आहे.
पहिला येणाऱ्यास प्राधान्य :ही सहल ‘ऑल-इन्क्लुसिव्ह’ पॅकेज अंतर्गत असून रेल्वे प्रवास, बजेट हॉटेल्समध्ये मुक्काम, शुद्ध शाकाहारी जेवण, स्थानिक वाहतूक, पर्यटन स्थळ भेटी, प्रवास विमा आणि आयआरसीटीसी टूर मॅनेजर्सची सेवा यांचा समावेश आहे. बुकिंग ‘पहिला येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर आयआरसीटीसीच्या पर्यटन पोर्टलवर सुरू आहे.अशी आहे महत्त्वाची माहिती :
- प्रस्थान : १८ फेब्रुवारी २०२६- कालावधी : १२ रात्री- १३ दिवस
- प्रमुख स्थळे: मुरुडेश्वर, रामेश्वरम, मदुराइ, कन्याकुमारी, तिरुवनंतपुरम, तिरुचिरापल्ली, कांचीपूरम, महाबलीपूरम
- इकॉनॉमी स्लीपर - २३३७०- स्टँडर्ड ३ एसी - ३६९९०- कम्फर्ट २ एसी - ४८,७६०
Web Summary : IRCTC launches 'Temple Trails of South' Bharat Gaurav Yatra on February 18, 2026, from Manmad. The 13-day tour covers major South Indian temples. It includes travel, stay, meals, and sightseeing. Bookings are open on a first-come, first-served basis.
Web Summary : आईआरसीटीसी ने 18 फरवरी, 2026 को मनमाड से 'टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण' भारत गौरव यात्रा शुरू की। 13 दिनों की यात्रा में दक्षिण भारत के प्रमुख मंदिर शामिल हैं। इसमें यात्रा, आवास, भोजन और दर्शनीय स्थल शामिल हैं। बुकिंग पहले आओ, पहले पाओ के आधार पर खुली है।