जप्त 80 लाखांचा तपास प्राप्तिकर विभागाकडे
By Admin | Updated: October 1, 2014 23:37 IST2014-10-01T23:37:21+5:302014-10-01T23:37:21+5:30
निवडणूक काळात घोडेबाजार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातून चार प्रकरणांत तब्बल 85 लाख 2 हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

जप्त 80 लाखांचा तपास प्राप्तिकर विभागाकडे
पुणो : निवडणूक काळात घोडेबाजार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातून चार प्रकरणांत तब्बल 85 लाख 2 हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यातील 8क् लाखांचा हिशेब तपासण्यासाठी संबंधित प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे देण्यात आले आहे.
मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पैशाचा वापर केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात सरासरी सहा पथके नेमण्यात आली आहेत. त्यात 69 स्थिर तपासणी पथके व 68 भरारी पथकांचा समावेश आहे. या शिवाय 78 तपासणी नाकेही आहेत.
या विषयी माहिती देताना जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार घटनेत जिल्ह्यात 85 लाख 2 हजार रुपयांची रोकड तपासणीत आढळून आली आहे, त्या पैकी 4 लाख 63 हजार रुपये संबंधिताला परत देण्यात आले आहेत तर दोन घटनांमध्ये 58 व 22 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. मात्र, या 8क् लाख रुपयांचा हिशेब सादर करू न शकल्याने ती रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. तसेच संबंधित रकमेचा स्नेत तपासण्यासाठी त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्यात आली आहे.’ (प्रतिनिधी)
4जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणावरील 51 हजार 832 बॅनर्स व पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली आहे.
4खासगी ठिकाणचे 4 हजार 75क् पोस्टर्स व बॅनर्स काढून टाकण्यात आले आहेत.
4आचारसंहिता भंगाच्या 2क् तक्रारी आल्या असून, त्यापैकी 8 प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नागरिक, व्यापा:यांनी मोठय़ा प्रमाणावर रकमेची वाहतूक करताना त्याचा हिशेब जवळ ठेवावा. तपासणीदरम्यान कोणालाही त्रस देण्याचा प्रशासनाचा हेतू नाही. एखाद्याने अगदी पाच कोटी रुपये जरी बाळगले तरी हरकत नाही. मात्र, त्याचा हिशेब देण्याची व कारण स्पष्ट करण्याची जबाबदारी संबंधितावर असेल.
- सौरभ राव, जिल्हाधिकारी