शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांची चौकशी करा; नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

By राजू इनामदार | Updated: June 12, 2025 18:57 IST

समिती स्थापन केल्यावर अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’

पुणे: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत बरेच गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यांच्या या आरोपांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेसने राज्यात मशाल मोर्चांचेही आयोजन केले आहे. आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचा पाठपुरावा करत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनाच त्यासंबधी पत्र पाठवले आहे.

‘गांधी यांनी आकडेवारीनिशी आरोप केले आहेत. त्यांचे निराकरण करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, मात्र ते काहीही बोलत नाहीत, त्याऐवजी केंद्र व राज्यातील सरकारमध्ये असलेले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी याला उत्तर देत आहे. तुम्ही देशाच्या सर्वोच्च अशा घटनात्मक पदावर आहात, त्यामुळेच तुम्हीच याची दखल घ्यावी. आरोपांच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करावी, तसेच समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करावे किंवा त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करावी’ अशी मागणी पटोले यांनी पत्रात केली आहे.

नाना पटोले सन २०१४ मध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले खासदार होते. पंतप्रधान मोदी यांची धोरणे पटत नसल्याची टीका करून त्यांनी सन २०१७ मध्ये खासदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष होते. त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले, मात्र नाना पटोले अल्प मतांनी विजयी झाले. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सध्या ते काँग्रेसच्या मुख्य प्रवाहापासून थोडे बाजूला असून प्रसिद्धीत राहण्यासाठी तसेच राहुल यांच्याबरोबर जवळीक साधण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचा प्रकार केला असल्याचे काँग्रेसमध्येच बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMahayutiमहायुती